The Belgaum regional department has been alerted because of the Corona virus
The Belgaum regional department has been alerted because of the Corona virus 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना व्हायरसची बेळगाव ने घेतलीय धडकी....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - जगभरात हाहाकार माजविणाऱ्या नोवेल कोरोना व्हायरसमुळे बेळगाव प्रादेशिक विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य खात्यातर्फे पूर्वखबरदारी घेण्यात आली आहे. बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड, गदग, हावेरी, कारवार आणि बेळगाव ग्रामीण विभागात संशयास्पद व्यक्‍ती आणि तीव्र ताप, थंडी, श्‍वसनाचा त्रास, खोकेचा त्रास असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. विभागातील सर्व सात जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना करण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. 

स्वाईन फ्लूच्या धर्तीवर कोरोना रोगाची लक्षणे दिसून येतात. संशयास्पद लक्षणे दिसून येताच त्याची खातरजमा करुन तातडीने औषधोपचार देणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्लक्ष केल्यास मृत्यू ओढावण्याची अधिक शक्‍यता असल्याने आरोग्य खात्याकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात तातडीने पाच बेड असलेल्या रोग नियत्रंण कक्षाची (आयसोलेशन वार्ड) सुरुवात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कक्षाची स्थापना केली आहे. 

कारवार आणि बेळगावात अधिक दक्षता

विदेशी प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा बेळगावशी अधिक संपर्क असल्याने बेळगाव आणि कारवार जिल्ह्यात विशेष लक्ष ठेवले आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विदेशी विद्यार्थी गेल्या चौदा दिवसापूर्वी चीनसह कोरोना रोगाची लागण झालेल्या देशात जाऊन आले आहेत. त्यामुळे तशा विद्यार्थ्यांची तपासणी करुन माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गोवा राज्यात विदेशी प्रवाशांची ये-जा अधिक असते. त्यामुळे कारवार आणि बेळगावात अधिक दक्षता घेतली आहे. 

विमानतळावर विशेष पथक नियुक्‍त 

बेळगाव आणि हुबळी विमानतळावर विशेष प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्‍ती करुन हेल्प डेस्क सुरु केला आहे. रोगाची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वेस्थानकामध्येही आरोग्य सहाय्यक, निरीक्षकांकडून कोरोना रोगाबद्दल जागृती करण्यात येत आहे. 


उत्तर कर्नाटकातील कोणत्याही जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रोगाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. खबरदारी म्हणून आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. 
-डॉ. अप्पासाहेब नरट्टी, विभागीय संचालक, 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा, बेळगाव विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT