belgaum municipal corporation sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : महापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा

आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळली आता प्रतीक्षा राजपत्रात नावे नोंद होण्याची

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या आरक्षणाच्या विरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने फेटाळली आहे. प्रभाग ७ चे नगरसेवक शंकर पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये ही याचिका दाखल केली होती. ११ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिका फेटाळल्याचे याचिकाकर्ते नगरसेवक पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे. आता नगरसेवकांची नावे नव्याने राजपत्रात नोंद झाल्यावर निवडणूक होणार आहे.

बेळगावसह राज्यातील तीन महापालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण २५ जानेवारी रोजी नगरविकास खात्याने निश्‍चित केले. त्यानुसार महापौरपद सामान्य महिला तर उपमहापौरपद इतर मागास ब महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. ३ सप्टेंबर २०१९ रोजी नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या आधारे बेळगावची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी असा नगरविकास खात्याचा आदेश आहे. पण, नगरसेवक शंकर पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला. फेब्रुवारी २०२१ मध्ये नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी त्यांनी नगरविकास खात्याने २५ जानेवारी रोजी बजावलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात बेळगाव महापालिका व कर्नाटक सरकारला प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाने ती याचिका दाखल करुन घेतली. पण, ११ मार्च रोजीच्या सुनावणीवेळी ती फेटाळली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पण, नगरविकास खात्याने सप्टेंबर २०१९ चे आरक्षण लागू केल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरेमोड झाला. बेळगावची महापालिका निवडणूक ३ सप्टेंबर रोजी झाली असून ६ मार्च रोजी मतमोजणी झाली आहे. पण, महापालिका निवडणूक झाल्यावर नगरविकास खात्याने महापौर व उपमहापौर आरक्षणाबाबत स्पष्टीकरण देण्यास विलंब लावल्याने महापौर निवडणुकीला विलंब लागला.

विलंबाला अनेक कारणे

आरक्षणाबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर महापालिकेने प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यास विलंब लावला. प्रादेशिक आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी नगरसेवकांचा पक्ष व प्रभाग आरक्षणाच्या माहितीसह नव्याने राजपत्रात नोंद करणे आवश्‍यक असल्याची सूचना दिली. त्यामुळे, महापालिका निवडणूक रखडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT