Belgaum  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : स्मार्ट कामांना हवी गतीची जोड

योजनेला सहा वर्षे पूर्ण; अनेक महत्त्वाची कामे, योजना कागदावरच

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : तब्बल सहा वर्षे उलटूनही बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेतील कामे अद्याप शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. २५ जून २०१६ रोजी स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या चार कामांचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले होते. पुढील पाच वर्षात म्हणजे २५ जून २०२१ पर्यंत स्मार्ट सिटी योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणे आवश्‍यक असतानाही ती झालेले नाही. आता सहा वर्षे पूर्ण होवूनही अनेक महत्वाची कामे व योजना सुरुच झालेल्या नाहीत.

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा केंद्रीय नगरविकास विभागाने केला आहे. त्यानुसार पुढील वर्षभरात बेळगावातील स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे पूर्ण होणे आवश्‍यक आहे. सद्यस्‍थितीत तरी बेळगावातील कामे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. या योजनेतील पहिल्या स्मार्ट रोडचे म्हणजे मंडोळी रोडचेच काम न्यायालयीन स्थगितीमुळे गेल्या चार वर्षांपासून थांबले आहे. संबधित ठेकेदाराने स्मार्ट सिटी विभागावर दावा ठोकला आहे. व्हॅक्सिन डेपोतील कामे न्यायालयीन स्थगितीमुळे गेले वर्षभर थांबली होती. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे काही कामांना ब्रेक लागणार आहे.

जानेवारी २०१६ मध्ये बेळगाव शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली, पण योजनेतील कामांची सुरुवात जून २०१६ मध्ये झाली. सप्टेंबर २०१६ मध्ये या योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील ४०० कोटी रुपये निधी मिळाला, पण २५ जून २०१६ रोजी शुभारंभ झालेल्या कामांसह योजनेतील अन्य सर्वच कामे रखडली. या योजनेचे व्यवस्थापकीय संचालकही सातत्याने बदलण्यात आले. त्यामुळेही योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आले. गेल्या सुमारे वर्षभरापासून प्रवीण बागेवाडी हे व्यवस्थापकीय संचालक असून सध्या कामे वेगाने सुरु झाली आहेत.

पूर्ण झालेली महत्त्वाची कामे

स्मार्ट बसथांबे (तीन टप्पे), शहापूरमधील रवींद्र कौशिक ई-लायब्ररी, वडगावमधील १० खाटांचे रुग्णालय, स्मार्ट बस स्टॅंड, खाऊ कट्टा, वॉटर किऑस्क, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, ट्रॉमा सेंटर, स्मार्ट क्लास रुम (दोन टप्पे), शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले डिस्प्ले बोर्ड्स, कमांड व कंट्रोल सेंटर, ट्रॉफीक सिग्नल्स, ई-रिक्षा वितरण, कणबर्गी तलाव सुधारणा, ६५ सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन्स, सराफ कॉलनी व नाथ पै उद्यानात थीम पार्क निर्मिती, पटवर्धन ले-आऊटमध्ये उद्यान निर्मिती, शांतीनगर येथे उद्यान निर्मिती, शहरातील प्रमुख रस्त्यांची सुधारणा.

प्रगतिपथावरील महत्त्वाची कामे

महात्मा फुले उद्यान सुधारणा, स्मार्ट क्लास रुम्स चौथा टप्पा, स्मार्ट शाळांमध्ये पायाभूत सुविधा, उद्यमबाग-टिळकवाडी-शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही बसविणे, अंगणवाडी सुधारणा भाग अ व भाग ब, रुक्मिणीनगर येथे स्मार्ट झोपडपट्टी, उत्तर ग्रामीण मतदारसंघात पाच ठिकाणी उद्यान निर्मिती, आर्ट गॅलरी, एव्हीएशन गॅलरी, ग्रामीण जीवन, हेरीटेज पार्क, व्हेंडींग झोन.सुरू न झालेले प्रकल्प शहरात ३५ हजार एलईडी दिवे बसविणे, बायसिकल शेअरिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT