belgaum start gram panchayat election result in belgaum for today morning 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात सकाळपासून मतमोजणीस सुरुवात ; निकालाची उत्सुकता शिगेला

मिलिंद देसाई

बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीस सकाळी 8 वाजल्यापासून बी. के. मॉडेल शाळेत सुरवात झाली. सकाळ पासूनच निकालाची उत्सुकता लागून राहिल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मत मोजणी केंद्राबाहेर प्रचंड गर्दी केली. तसेच 10 वाजल्यापासून निकाल हाती येत आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने काही ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

22 डिसेंबर रोजी झालेल्या पंचायत निवडणूकीत मतदान झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनातर्फे मत मोजणीची तयारी केली जात होती. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीचे काम हाती घेण्यात आले असून सायंकाळी उशिरापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये मतमोजणीसाठी 55 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तीन टप्प्यात होणार आहे. कोविडच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. त्यामुळे मत मोजणीवेळी फक्त उमेदवार किंवा त्यांचा अजेंट यांना प्रवेश दिला जात आहे.  

निवडणूक अधिकाऱ्यांनी बेळगाव तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतीसाठी वेळ निर्धारित केला आहे. त्यानुसार सकाळी 8 ते 11 या वेळेत पहिल्या टप्प्यातील, 11 ते दुपारी 2 (अंदाजे)  या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील आणि दुपारी 2 ते (अंदाजे) सायंकाळी 5 या वेळेत तिसऱ्या टप्प्यातील मतमोजणी काम हाती घेतले जाणार आहे. सकाळी पहिल्या टप्प्यात अंकलगी, धरणटी, बस्तवाड, कलखांब, तुमरगुद्दी, हिरे बागेवाडी, हिंडलगा, कुकडोळी, अष्टे, हांदिगनूर,मास्त मरडी, सुळगा (उ.), तुरमुरी, मुतगा, कुद्रेमनी, मंडोळी, कंग्राळी बी.के. बाळेकुंद्री के. एच. या ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू असून आता पर्यंत 6 निकाल हाती आले आहेत.

मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगावसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील केंद्रावरही मत मोजणीला सुरुवात झाली असुन गर्दी करण्यास पोलीस मज्जाव करीत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT