उसतोड esakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : ‘उसतोड’ मुलांचे भवितव्य अधांतरी

जिल्ह्यात तंबू शाळा नाहीतच; शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : उसतोड कामगारांच्या मुलांचे भवितव्य अधांतरी ठरू लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात तंबू शाळा सुरू नसल्याने शेजारील महाराष्ट्रातून येणाऱ्या उसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. अजूनही कर्नाटक शिक्षण खात्याकडून केवळ सर्वेक्षणाचे निमित्त केले जात आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीआय) सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण मिळणे, हा मुलांचा हक्क आहे. बेळगाव जिल्हा हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आहे. बेळगाव जिल्हा साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीसह एकूण २३ साखर कारखाने आहेत. त्यामुळे प्रत्येक उसतोड हंगामात महाराष्ट्रातील उसतोड कामगारांच्या टोळ्या बेळगावात येतात. असे कामगार आपल्यासोबत आपले कुटुंबही घेऊन येतात. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता येत नाही. यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना कर्नाटक शिक्षण खात्याकडून तंबू शाळा सुरू करून त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण

दिले जाते. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात अथणी, कागवाड, चिक्कोडी या ठिकाणी साखर कारखाने असून तेथे या निवासी शाळा सुरू केल्या जातात. मात्र, यावर्षी ऊस तोडणी हंगाम सुरू होऊनही तंबू शाळा मात्र सुरू झालेल्या नाहीत. उसतोड कामगार हे महाराष्ट्रातून आल्यामुळे कर्नाटककडून हा दुजाभाव होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उसतोड हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत, पण तरीही आतापर्यंत शिक्षण खात्याकडे किती उसतोड कामगारांची मुले कुटुंबासमवेत आली आहेत, याची माहितीच नाही. केवळ सर्वेक्षण होणे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षण खात्याचे सर्वेक्षण कधी पूर्ण होणार? तसेच या मुलांना शिक्षण कधी मिळणार, हा एक प्रश्‍नच आहे.

जिल्हा पंचायतने घ्यावी दखल

जिल्हा पंचायतीचे सभागृह अस्तित्वात असताना प्रत्येक वर्षी जिल्हा पंचायतीचे सदस्य याबाबत सभागृहात आवाज उठवत होते. अनेकवेळा शिक्षण खात्याकडून तंबू शाळा सुरू न करताच कागदोपत्री शाळा सुरू केल्याचे दाखविले होते. मात्र, सभागृहात सदस्यांनी हा गैरकारभार उजेडात आणला होता. त्यामुळे जिल्हा पंचायतीचे सभागृह अस्तित्वात असताना ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात होती. आता निवडणुका न झाल्याने जिल्हा पंचायतकडूनही याची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT