Black Day sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : सीमाभागात उद्या काळा दिन, मराठी भाषिक उतरणार रस्त्यावर

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हापासून मराठी भाषिक दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध फेरीमध्ये सहभागी होत असतात.

मिलिंद देसाई

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हापासून मराठी भाषिक दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध फेरीमध्ये सहभागी होत असतात.

बेळगाव - भाषावर प्रांत रचना करताना झालेल्या अन्याया विरोधात सोमवारी, एक नोव्हेंबर रोजी मराठी भाषिक मंगळवारी रस्तावर उतरणार असून धर्मवीर संभाजी उद्यान येथुन सकाळी ९ वाजता भव्य सायकल फेरीला सुरुवात होणार आहे. तसेच निषेध फेरीची सांगता झाल्या नंतर मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी विविध नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला तेंव्हापासून मराठी भाषिक दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध फेरीमध्ये सहभागी होत असतात. यावेळीही भव्य प्रमाणात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून, सर्वच भागातून युवा वर्गासह आबालवृध्द फेरीत सहभागी होणार आहेत. सोशल मीडियावरून देखील काळ्या दिनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून, एक दिवशी झालेल्या अन्याय विरोधात काळा दिन पाळणा जात असल्याने या दिवशी काळे कपडे परिधान केले जाणात त्यामुळे काळे टी-शर्ट व काळ्या कपड्यांना देखिल गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे.

समितीने फेरी व सभेची तयारी पूर्ण केली असून शहराच्या विविध भागातून निषेध फेरी काढल्यानंतर मराठा मंदिर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ज्या मार्गावरून फेरी काढण्यात येणार आहे. त्या मार्गाची पाहणी केली होती. यावेळी समिती नेत्यांनी फेरीच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत विविध ठिकाणी टाकण्यात आलेली माती व इतर साहित्य हटविण्यात आली आहे. मुळे फेरीच्या मार्गावरील अडथळे दूर झाले असून समितीने फेरी शांततेत काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले असून, फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता असून शिवसेना, युवा समिती, तालुका युवा आघाडी, महीला आघाडी यासह शहराच्या विविध संघटनानी फेरीला जाहिर पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे फेरी मोठया प्रमाणात निघणार आहे.

फेरीचा मार्ग पुढील प्रमाणे

धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथून सुरुवात, भांदूर गल्ली, कोनवाळ गल्ली, टिळक चौक, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, नार्वेकर गल्ली, शहापूर बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडे बाजार बँक ऑफ इंडिया महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपिडी कॉलेज कॉर्नर, सी डी देशमुख रोड, शुक्रवार पेठ गोवावेस येथे सांगता त्यानंतर मराठा मंदीर येथे सभा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT