Belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : कोगनोळीत `बर्निंग ट्रक`चा थरार

चालत्या आयशरला आग : राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास बंद

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी: राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशर ट्रकला आग लागल्याची घटना रविवारी (ता. 13) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. `बर्निंग ट्रक`चा थरार यावेळी अनुभवायला मिळाला. आगीत वाहन जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. आगीचे उग्र रूप पाहून पोलिसांनी अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून बंगळूरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन कोगनोळी फाट्यावर असणाऱ्या सेवा रस्त्यावर आणून सर्व्हिंसिंग सेंटरमधील पाण्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. चालक व अन्य नागरिकांनी जळत असलेले वाहन सोडून लांब थांबले. रौद्ररूप धारण करुन ट्रकला चार बाजूने मोठी आग लागली.

कागल नगरपालिका व निपाणी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पण आयशर ट्रक व त्यामध्ये असणारे कपडे जळून खाक झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महामार्गावर अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. कोगनोळी उपठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी नागरिकांना लांब थांबवण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. घटनास्थळी पंचक्रोशीसह महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT