belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : ‘चेंबर ऑफ कॉमर्स’साठी उद्या मतदान

५ जागांसाठी १० जण रिंगणात, बीसीसीआय कार्यालयात होणार मतदान

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजसाठी सोमवारी (ता. २७) मतदान प्रक्रिया पार पडेल. सोमवारी (ता. २७) सकाळी १० ते दुपारी ३ वेळेत न्यू गुड्सशेड रोड येथील बीसीसीआयच्या कार्यालयात मतदान होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण रेंगोळे व प्रभाकर परमशेट्टी काम पाहत आहेत.

उद्योजकांच्या उद्याेगासंबंधी असलेल्या समस्या सोडवण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स काम करते. जिल्हा चेंबरचे एकूण २६ सदस्य आहेत. यापैकी दरवर्षी १० जणांसाठी मतदान होते. काही सदस्यांचा कालावधी १ वर्ष व काही सदस्यांचा कालावधी ३ वर्षांचा असतो. त्याप्रमाणे मतदान प्रक्रिया राबविली जाते. यंदा १० पैकी पाचजणांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या पाच जागांसाठी १० जण रिंगणात आहेत.

ट्रेड व इंडस्ट्रीमधून १० जागांसाठी अर्ज भरणा करण्यात आला होता. यामध्ये ट्रेडच्या सहा व इंडस्ट्रीच्या ४ जागांचा समावेश आहे. ट्रेडचे सुधीर चौगुले तर इंडस्ट्रीमधून दिलीप चिंडक, किथ मचाडो, उदय जोशी आणि सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. ट्रेडच्या ५ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

यामध्ये भूपेंद्र पटेल, मनोजकुमार मतिकोप, प्रशांत कलीमणी, संजीव कट्टीशेट्टी, सतीश पाटील, सतीश गौरगोंडा, सतीश चौगुले, सोमशेखर चौन्नद, स्वप्नील शहा, व्यंकटेश शहापूरकर यांची एकमेकांत लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT