belgaum weaver sale sarees demand for state government karnataka 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यभरातील विणकरांनी विणलेल्या पंधरा लाखांहून अधिक साड्या पडूनच

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोना संकटामुळे राज्यातील विणकर बांधवांची परिस्थिती दयनीय बनली आहे. यामुळे राज्य सरकारने त्यांच्या विकासासाठी विणकर महामंडळाची स्थापना करावी आणि या मंडळासाठी 100 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी मागणी राज्यातील विविध विणकर संघटना आणि नेत्यांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांनीही विणकर प्राधिकार मंडळ स्थापन करण्याबाबत आश्वासन दिले आहे. उत्तर कर्नाटक विणकर विकास संघटनेच्या वतीने ही या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे परशुराम ढगे यांनी ही मागणी रास्त असून राज्य सरकारने विणकरांसाठी प्राधिकार स्थापन करावे, अशी मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची शुक्रवारी प्राधिकार स्थापन करणेबाबत नुतन राज्यसभा सदस्य डॉ. के. नारायण यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूर चे माजी उपमहापौर हरीश आणि विणकर नेत्यांनी भेट घेतली. आणि महामंडळाची स्थापन करण्याची मागणी केली. कोरोना कालावधीत राज्यातील विणकरांची परिस्थिती दयनीय बनली आहे. राज्यभरातील विणकरांनी विणलेल्या सुमारे पंधरा लाखांहून अधिक साड्या पडून आहेत. या साड्यांची सरकारने खरेदी करावी, अशी मागणी याआधीच करण्यात आली आहे.

सरकारनेही साड्या खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ही प्रक्रिया सुरू झाली नाही. यामुळे या साड्यांची खरेदी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याबरोबरच राज्यातील प्रत्येक विणकर बांधवाना पाच हजार रुपयांची मदत करावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT