KOP20J54329.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावच्या तरुणांची फलटणमधून पायपीट; महापालिकेने केली व्यवस्था 

सकाळवृत्तसेवा

सांगली : संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने सगळीकडे बंदी आहे. वाहने तर जागच्या जागी थांबल्याने गावाकडे जाऊ इच्छिणाऱ्यांची ससेहोलपट सुरु आहे. बेळगावमधील अशाच पंधरा तरुणांवर कंपनी बंद झाल्याने गावाकडे जाण्याची वेळ आली. मात्र वाहने बंद असल्याने पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. उपाशी पोटीच ते आज सांगलीत आले. त्यांना महापालिकेच्या भरारी पथकाने ताब्यात घेऊन जेवणाची व्यवस्था केली तसेच त्यांची आरोग्य तपासणीही केली. 

फलटण मधील एक खाजगी कंपनीवरही कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले. कंपनी बंद झाल्यामुळे तेथे काम करणाऱ्या बेळगावच्या तरुणांवर परत जाण्याची वेळ आली. मात्र वाहने बंद असल्याने जायचे कसे असा प्रश्‍न आला. अखेर आपले साहित्य पाठीवर टाकत त्यांनी पायीच बेळगावला जाण्याचा निर्णय घेतला. गेले तीन दिवस कोणतेही वाहन उपलब्ध न झाल्यामुळे हे तरुण फलटणमधून निघाले. आज सकाळी ते सांगलीत पोचले. सुमारे दीडशे किमीचे अंतर ते चालत आले होते. 

महापालिकेच्या भरारी पथकाला हे टोळक चालत जाताना दिसले. त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतलं. त्यावेळी हे तरुण थकलेले होते. ते तीन दिवस उपाशी असल्याचे लक्षात आले. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी या तरुणांच्या आंघोळीची व्यवस्था करुन नंतर त्यांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्राचे मुस्तका मुजावर यांच्याकडे सोपवले. मुजावर यांनी या सर्व तरुणांच्या जेवणाची सोय केली. त्यांना मालू हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आणखी 60 ते 65 तरुण असा पायी प्रवास करत असल्याचे या तरुणांनी सांगितले. 

बेळगावमधील हे तरुण फलटणमधून चालत गावाकडे निघाले होते. त्यांची सांगलीत मालू हायस्कूल येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बेळगावला पाठवण्यात येईल. मिरजेतील खतीबनगर येथेही असे सुमारे दोनशे लोक ठेवले आहेत. डॉ. विनोद परमशेट्‌टी यांनी या नागरिकांची तपासणी केली आहे. 
स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT