राणी चन्नम्मा विद्यापीठ sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum News: कन्नडसक्ती रद्दच्या आदेशानंतरही विद्यापीठाकडून चालढकल

एकीकडे कन्नडसक्ती मागे घ्यायची तर दुसरीकडे विषय बदल होऊ नये यासाठी सॉप्टवेअर लॉक ठेवायचे, असा प्रकार विद्यापीठाकडून होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदवीतील कन्नडसक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थी कन्नड विषय बदलून घेण्यासाठी महाविद्यालयांकडे मागणी करत आहेत. मात्र, विद्यापीठाने आपले सॉप्टवेअर लॉक ठेवल्यामुळे विषय बदलताना अडचणी येत आहेत. एकीकडे कन्नडसक्ती मागे घ्यायची तर दुसरीकडे विषय बदल होऊ नये यासाठी सॉप्टवेअर लॉक ठेवायचे, असा प्रकार विद्यापीठाकडून होत आहे. (Belgaum District News)

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्यानुसार पदवीत कन्नडसक्ती करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या विषयाची निवड केली आहे. त्याविरोधात विविध संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने ही सक्ती मागे घेत विद्यापीठाने कन्नडसक्ती मागे घेण्याचा आदेश बजाविला. मात्र, महाविद्यालयांकडून प्रवेशासाठी बनविलेले ‘युयुसीएमएस’ सॉप्टवेअर लॉक ठेवले आहे.

यामुळे विषय बदलताना अडचणी येत आहेत. बेळगाव शहर व परिसरात महाराष्ट्र, गोवासह विविध राज्यातील विद्यार्थी आहेत. त्यांनाही कन्नड विषय सक्ती होती. विद्यापीठाच्या आदेशानंतर हे विद्यार्थी विषय बदलण्यासाठी महाविद्यालयाकडे मागणी करत आहेत. मात्र, सॉप्टवेअर लॉक असल्याने महाविद्यालयांचे हात बांधले गेले आहेत. काही महाविद्यालयातील प्राचार्यही वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांनी आवडीने कन्नड विषय निवडला असल्याने आता विषय बदलून मिळणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. कन्नड विषयाची इंटरनल गुणही दिले असल्याने विषय बदलून दिला जाणार नसल्याचे काही प्राचार्य सांगत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. सध्याची सेमीस्टर ९ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. २५ फेब्रुवारीनंतर परीक्षा होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यार्थी बुचकळ्यात सापडले आहेत. विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात मराठी, कन्नड, उर्दू, हिंदी आदी भाषेची मुले आहेत. ज्यांना कन्नड विषय नको आहे, त्यांना विद्यापीठ व महाविद्यालयाच्या भूमिकेमुळे दोन वर्षे कन्नड शिकावे लागणार आहे.

विद्यार्थी संघटना गेल्या कुठे?

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी विद्यार्थी संघटना आक्रमक असतात. त्यांच्याकडून आंदोलनेही केली जातात. मात्र, आता एकही विद्यार्थी संघटना पुढे येताना दिसत नाही. विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेऊन यासंबंधी विद्यापीठ व संबंधीत महाविद्यालयांना जाब विचारल्यास ही समस्या निकालात काढली जावू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT