Belgoan livestock Increase sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जिल्ह्यात 'पशुधनात' १० लाखांनी वाढ

२९.५९ लाख संख्या; २०१२ मध्ये पाळीव जनावरांची संख्या १९.२० लाख

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यात पशुधनाच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती जनावरांच्या गणतीतून समोर आली आहे. पशुसंगोपन खात्याकडून दर पाच वर्षांतून एकदा जनावरांची गणती केली जाते. २०१९ पासून २०२१ पर्यंत चाललेल्या २० व्या गणतीत सर्व प्रकारच्या जनावरांची गणती करण्यात आली. त्यात जिल्ह्यात गायी, बैल, रेडे, शेळ्या-मेंढ्या, डुक्कर यांची संख्या २९ लाख ५९ हजार ८४५ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात पशु संगोपन खात्याकडून २०१२ मध्ये करण्यात आलेल्या १९ व्या राष्ट्रीय गणती अहवालानुसार जनावरांची संख्या १९.२० लाख होती. तर २० व्या गणतीमध्ये त्यात १० लाखांनी वाढ झाली आहे. नजीकच्या बागलकोट, विजापूर, धारवाड जिल्ह्यांमध्येही जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशी गायीच्या संख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे तसेच प्रोत्साहन आणि अनुदान मिळत असल्याने २०१७ ते २०२२ या काळात म्हशी, गायी पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. देशी जनावरांच्या संख्येत शेकडा २० टक्के वाढ झाली आहे. बैल प्राण्यांच्या संख्येत ३५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात गायी, म्हशी आणि बैल विक्री दरात मोठी वाढ झाली आहे. देशी तसेच संक्रमित गायींच्या किंमती ६० ते ९० हजार रुपये, म्हशी ४५ ते ७५ हजार रुपये दराने विक्री केल्या जात आहेत. बैलांच्या जोडीला ६० हजार ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत आहे.

म्हशींच्या संख्येत वाढ

पशु संगोपन खात्याकडून करण्यात आलेल्या गणतीनुसार चार-पाच वर्षांमध्ये बेळगाव, चिक्कोडी, बैलहोंगल या भागांत म्हशींच्या संख्येत ८ लाख ४४ हजार १७१ इतकी वाढ झाली आहे. २०१९ च्या गणतीची तुलना केल्यास म्हशी पाळण्यामध्ये ३५ टक्के (७.१९ लाख) इतकी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रायबाग आणि अथणी तालुक्यामध्ये म्हशींची संख्या १ लाख पार झाली आहे. सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यात म्हशींची संख्या ३० हजार आहे.

जिल्ह्यात गायी, म्हशी आणि शेळ्या पाळण्याची संख्या वाढली असल्याचे गणतीदरम्यान दिसून आले आहे. बैल आणि मेंढ्या पाळण्याचे प्रमाण घटले आहे. दरवर्षी देशी आणि संक्रमित जनावरे पाळण्याच्या संख्येत वाढ होत आहे.

- डॉ. ए. के. चंद्रशेखर, उपसंचालक, पशु संगोपन खाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT