Rekha Short Film sakal
पश्चिम महाराष्ट्र

Rekha Short Film : बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये तासगावच्या ‘रेखा’चा डंका!

मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाला १५ व्या बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्तम इंडी फिल्म’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळाले.

रवींद्र माने

मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाला १५ व्या बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्तम इंडी फिल्म’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळाले.

चित्रपट निर्माते रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत, मेघना जाधव निर्मित आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाला १५ व्या बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्तम इंडी फिल्म’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळाले आहेत. शेखर रणखांबे हे तासगाव तालुक्यातील पेड या गावचे आहेत. नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली.

रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या, भंगार गोळा करणाऱ्या, भीक मागणाऱ्या महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेचा विषय ‘रेखा’ या लघुपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात रेखा ही प्रमुख भूमिका तासगाव येथील माया पवार या भटक्या समाजातील एका तरुणीने साकारली आहे. संपूर्ण लघुपट तासगाव, सांगली बस स्थानक, हरिपूर या परिसरात चित्रित करण्यात आला आहे. या लघुपटात जिल्हा आणि परिसरातील कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

पेड येथील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या कथेला प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य निर्माते रवी जाधव यांनी हिरवा कंदील दाखविला आणि ‘रेखा’ची निर्मिती झाली. या लघुपटाने गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन पुरस्कार मिळाले याशिवाय देशभरातील फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाने वेगवेगळे पुरस्कार मिळवले आहेत.

याशिवाय आता बर्लिन येथे १७ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट इंडी फिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे दोन पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यातील कलाकारांचा डंका बर्लिन येथे वाजला असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. पेड येथील शेखर रणखांबे यांच्या ‘पामप्लेट’, ‘धोंडा’ या लघुपटांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘रेखा’चे निर्माते रवी जाधव यांनी हा लघुपट बर्लिन येथे १७ व्या चित्रपट महोत्सवासाठी पाठविला होता. त्याला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याचे बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या संयोजकांनी कळविले, असे ‘रेखा’चे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT