Siddharam Mhetre Bharat Bhalke
Siddharam Mhetre Bharat Bhalke 
पश्चिम महाराष्ट्र

आमदार म्हेत्रे, भालकेंची सोलापुरात प्रतीक्षा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : कॉंग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि भारत भालके यांना कॉंग्रेसकडून इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला मात्र दुपारी साडेचार पर्यंत ते कॉंग्रेस भवनात पोचले नव्हते. कॉंग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोघांशीही संपर्क साधला पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. भालके मुंबईत तर म्हेत्रे अज्ञात स्थळी असल्याचे सांगण्यात आले.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलाखतीना सुरुवात झाली. पहिल्या टप्यात शहरातील तिन्ही मतदार संघातील मुलाखती संपल्यानंतर जिल्हाच्या मुलाखती सुरु आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी मुलाखत दिली.

माजी आमदार दिलीप माने यांनी मुलाखतीस आपला प्रतिनिधी पाठविला होता. त्यांच्याशिवाय इंदुमती अलगोंडा पाटील यानीही दक्षिण सोलापूर मधून उमेदवारी मागितली आहे.

सोलापूर शहर उत्तर : राजन कामत, सुदीप चाकोते व सातलिंग शटगार. 

सोलापूर शहर मध्य : आमदार प्रणिती शिंदे, असिफ इक्‍बाल शेख, इश्‍ताक जहॉंगिरदार, दत्तात्रय लोकरे 

दक्षिण सोलापूर : दिलीप माने, इंदुमती अलगोंडा पाटील, प्रशांत कांबळे आणि हरिष गुरुनाथ पाटील 

अक्कलकोट : आमदार सिद्धाराम म्हेत्रे, डॉ. सुवर्णा मलगोंडा, धर्मराज राठोड, महिबूब मुल्ला, श्रीकंठ महास्वामी व सातलिंग शटगार 

मोहोळ : गौरव खरात आणि किशोर पवार 

पंढरपूर : आमदार भारत भालके आणि शिवाजीराव काळुंगे 

बार्शी : डॉ. विजय साळुंके, ऍड. जीवनदत्त आरगडे, हाजी रमजान पठाण आणि नागनाथ चव्हाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT