नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार sakal media
पश्चिम महाराष्ट्र

...तर कठोर निर्बंध लावणार : डॉ. भारती पवार

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना सतर्क राहण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : संपूर्ण देशात सध्या ओमिक्रानचा प्रादुर्भाव (Omicron Variant) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना सतर्क राहण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वेळ पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Sangali Corona Updates)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज सांगलीचा धावता दौरा केला. कोल्हापूरहून उस्मानाबादला जात असताना त्यांनी सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास भेट दिली.

पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या,‘‘देशात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य सरकारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळ पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा लवकर होतो. असे असले तरी तो लवकर बराही होत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.’’

केंद्राने राज्य सरकारांना दोन पॅकेज मधून विशेष मदत केली आहे. पॅकेजचा निधीही वितरित करण्यात आला आहे. यामधून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येतील. लॉकडाउनचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा आहे. कंटेन्मेंट झोन करणे, कडक नियम लावणे हे सर्व काम राज्य सरकारांनी करायचे आहे. रुग्ण संख्या वाढल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे.

- डॉ.भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT