crime
crime sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकावर चाकू हल्ला; ७ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : भवानीनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिकावर चाकू हल्ला आणि आरोपींना पळून जाण्यासाठी सहाय्य करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी आज (ता.२३) अटक केली. सर्वेश सपकाळ (वय २०), सागर मठपती (वय २४. दोघे रा. शास्त्रीनगर) अशी त्यांची नावे आहेत. यामुळे आतापर्यंत प्रकरणांत सात जणांना अटक झाली आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दौड्डबोम्मण्णावर (वय ४६, मूळ रा. हालगा-बस्तवाड, सध्या रा. मंडोळी रोड, भवानीनगर) यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे सोमवारी (ता.२१) उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुत्रधार आणि मारेकऱ्यांचा फास आवळण्यास सुरु कली आहे. त्यानुसार आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली. त्यात राजू यांची पत्नी किरण आणि त्याचे भागीदार शशिकांत शंकरगौडा (४४, रा. अलारवाड) व धर्मेंद्र घंटी (५१, रा. हालगा-बस्तवाड) व मारेकरी संजय चिन्नस्वामी रजपूज (वय ४८), विजय जागृत (वय ३५, दोघे रा. कपिलेश्‍वर कॉलनी, बेळगाव) यांचा समावेश आहे. यात आज दोघांची भर पडली. दोघांपैकी सपकाळ याने राजू याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. रिअल इस्टेट व्यवसायिक राजू गाडीतून मंडोळीला वॉकिंगनिमित्त पोचला.

गाडीतून खाली उतरल्यानंतर त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा मिरचीपूड फेकण्यात आली. त्यानंतर चाकू हल्ला झाला. हा हल्ला सपकाळ याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. डोळ्यामध्ये मिरचीपूड फेकण्यात आल्यानंतर मयत राजू आरडाओरड करु लागला. मदतीसाठी हाक देऊ लागला. यासंदर्भात तेथे मठपती याने गाडी आणली आणि त्यात संशयित बसवून घेऊन फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी चाकू हल्ला आणि संशयितांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या वाहन चालकाला जेरबंद करून हिंडलगा रवानगी हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी केली आहे. दरम्यान, दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केल्याने आतापर्यंत ७ जणांना अटक झाली असून, दोघे फरारी आहेत. त्यांचा तपास सुरु असल्याचे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT