corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मोठी ब्रेकिंग : सांगलीत "कोरोना' चा पहिला बळी, बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

सांगली- इस्लामपुरातील 26 पैकी 25 कोरोना बाधित रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आज सांगलीतील एका 47 वर्षीय बॅंक कर्मचाऱ्यास "कोरोना' ची लागण झाल्याचे आज पहाटेच स्पष्ट झाले होते. संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर बनल्यामुळे "व्हेंटिलेटर' वर ठेवण्यात आले होते. दुर्दैवाने सायंकाळी संबंधित रूग्णाचा मृत्यू झाला. सांगलीतील हा "कोरोना' चा बळी ठरला आहे.

 
सांगलीतील गणपती पेठेतील कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी बॅंकेतील कर्मचाऱ्यास "कोरोना' ची लागण झाल्याचे आज पहाटेच स्पष्ट झाले होते. कर्मचाऱ्याचे घर विजयनगर येथे असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसरच "सील' करून टाकला होता. 55 ठिकाणी "बॅरिकेटस्‌' लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर "सील' केल्यानंतर सांगली-मिरज हा संपूर्ण रस्ता बंद केला आहे. तसेच परिसरावर "ड्रोन' कॅमेऱ्याची घरघर सुरू ठेवली आहे. 


मिरजेतील "कोरोना' हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती खालावल्यामुळे "व्हेंटीलेटर' वर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या संपर्कातील 27 जणांना क्वारंटाईन करून त्यांच्या स्वॅब चाचणीचे नमुने तपासणीसाठी घेतले. दुपारनंतर कर्मचाऱ्याची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याचे समजले होते. त्यामुळे सर्वत्र भितीदायक वातावरण होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कर्मचाऱ्याच्या घरापासून एक किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला. तर 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. 


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत रूग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाहीर केले होते. मिरजेतील कोरोना हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथक शर्थीने प्रयत्न करत होते. परंतू दुर्दैवाने संबंधित बॅंक कर्मचाऱ्याचे सायंकाळी उपचार सुरू असताना निधन झाले. 

हे पण वाचा - ना वऱ्हाड, ना वरात, दुचाकीवरून थेट घरात                                            

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा; पाचवी- आठवीच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल आणि चौथी- सातवीची २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

अग्रलेख - पुढचे पाऊल

जप कधी, कुठे, कसा? सगळे प्रश्न विसरा… ‘श्वासागणिक नामस्मरण’ हेच खरं साधन!

Immunity Boosting Soup: थंडीमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी १५ मिनिटांत बनवा दुधीभोपळा अन् शेवग्याचं सुप, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 08 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT