corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी : "त्या' कुटुंबातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह, इस्लामपुरची ती महिलाही "कोरोना' मुक्त 

सकाळवृत्तसेवा

सांगली- विजयनगर येथील मृत बॅंक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पाच जणांचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. त्यामध्ये आई-वडील, पत्नी, भाऊ आणि मुलगा यांचा समावेश आहे. तसेच मृत व्यक्तीच्या संपर्कातील अन्य 11 जणांचा अहवाल देखील "निगेटीव्ह' आला आहे. याशिवाय आणखी एक दिलासा देणारी घटना घडली असून इस्लामपूरच्या त्या कुटुंबातील महिलेचा अहवाल देखील "निगेटिव्ह' आला आहे. इस्लामपुरच्या कुटुंबातील सर्व 26 जणांचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. 


विजयनगर येथील बॅंक कर्मचाऱ्यास रविवारी "कोरोना' ची लागण झाल्याची माहिती पुढे आल्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तशातच सायंकाळी कर्मचाऱ्याचा "कोरोना' मुळे मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पाचजण आणि संपर्कातील इतरांना क्वारंटाईन केले. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन मिरजेतील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. आज सकाळपासून त्या सर्वांच्या अहवालाची प्रतिक्षा होती. सकाळी मृताच्या कुटुंबातील पाचपैकी आई-वडील, पत्नी आणि भाऊ या चौघांचा अहवाल "निगेटिव्ह' आला होता. तर मुलाचा अहवाल प्रलंबित होता. सायंकाळी मुलाचा अहवाल देखील निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला. तसेच मृत व्यक्तीच्या संपर्कातील 11 जण "इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन' मध्ये होते, त्यांचेही अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. ते सर्व "निगेटीव्ह' असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 


तसेच दुसरी एक दिलासादायक बातमी प्राप्त झाली. ती म्हणजे इस्लामपूर येथील "कोरोना' बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील "आयसोलेशन' कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही "निगेटीव्ह' आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT