corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मोठा दिलासा : कदमवाडीतील 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

ढालगाव (सांगली)- कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील नवी मुंबई येथून आलेल्या महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 22 जणांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने कदमवाडीकरांना दिलासा मिळाला आहे; मात्र अंबरनाथ (मुंबई) येथून आलेल्या एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. 


कदमवाडी येथे मुंबईवरून आलेला दुसरा रुग्ण आढळल्याने ढालगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
कदमवाडी येथे दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून कदमवाडी येथील आपल्या गावाकडे आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 22 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईनसाठी नेण्यात आले होते. त्यांपैकी बावीसही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने कदमवाडीकरांना थोडाफार दिलासा मिळाला होता; मात्र 1 तारखेला अंबरनाथ (मुंबई) येथून चौघा जणांचे कुटुंब कदमवाडी येथील आपल्या गावाकडे आले होते. त्या सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांतील एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी समजल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.

कोरोना बाधित महिलेच्या घरातील चार जणांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्यांच्या संपर्कातील 6 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनसाठी नेण्यात आले आहे. दुधेभावी, घोरपडी व आता कदमवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ढालगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ढालगाव परिसरात 5, तर तालुक्‍यात सातवा रुग्ण सापडला आहे. अंबरनाथ मुंबई येथून आलेल्या कुटुंबातील घराजवळ एक किलोमीटरचा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. 
गावात आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तहसीलदार बी. जे. गोरे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांनी गावात भेटी देऊन दक्षता घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT