Bikaner Pune Railway sakal
पश्चिम महाराष्ट्र

Railway : ‘बिकानेर-पुणे’ धावणार मिरजेपर्यंत

बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस रेल्वे आता मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत धावणार आहे. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या गाडीसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस रेल्वे आता मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत धावणार आहे. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या गाडीसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या गाडीला सांगली आणि किर्लोस्करवाडी थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे रेल्वे अभ्यासक व प्रवासी संघटनेने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

माजी खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस ही मिरज रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली. याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय नीलम यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आले आहेत.

बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्स्प्रेस सोमवार व मंगळवारदरम्यान धावते. ही एक्स्प्रेस मिरज रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करा, अशी खूप दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

मिरजेपर्यंत विस्तारित झाल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल व त्याचा प्रवशांना नक्कीच लाभ होईल, असे सांगण्यात आले होते. आज त्याला मंजुरी मिळाली आहे. पुणे ते मिरजदरम्यान या एक्स्प्रेसला आता कऱ्हाड, सातारा व लोणंद येथे थांबे देण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marco Rubio Warning : पंतप्रधान मोदी-पेजेश्कियान भेटीनंतर अमेरिकेचा भारताला इशारा; इराणसोबत व्यापार केल्यास निर्बंध?

‘परस्पर संमतीने घेतला निर्णय’ बादशाह-ईशा रिखीचं नातं अखेर संपलं; रॅपरने स्वतःच केला मोठा खुलासा!

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज परभणी, धाराशिवमध्ये बंदची हाक

"जरा हुक्का पिके आता हू"; MS Dhoni च्या Video ने खळबळ; रिषभ पंतची अवस्था पाहून नेटकरी संतापले, समोर बिअरचा टीन?

El Nino weather impact : ‘एल निनो’चा धोका वाढला; पुढील ६ महिने अत्यंत महत्त्वाचे, पूर-दुष्काळासह उष्णतेचा इशारा

SCROLL FOR NEXT