Biometric systems shut down in Mahavitran for fear of corona 
पश्चिम महाराष्ट्र

डर जरूरी है ः कोरोनामुळे महावितरणमध्ये हा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

राजूर : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, त्यामुळे जगभरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

भारतातही काही रुग्ण सापडल्यामुळे आपल्या देशातही कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात अद्याप रुग्ण आढळून आलेला नसला, तरी कोरोना विषाणूचा प्रसार कार्यालयामध्ये होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण कंपनीने राज्यभरातील कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी आजपासून बंद केली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत ही हजेरी पद्धत बंद राहील, असा आदेश महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक कमांडर शिवाजी इंदलकर यांनी दिला आहे. 


राज्य शासनाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असून, सकाळी दहा ते सायंकाळी सव्वासहापर्यंत कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे.

सकाळी वेळेत कार्यालयात न आलेल्या कर्मचाऱ्यांचा "लेट मार्क' पडत होता; मात्र "कोरोना'मुळे बायोमेट्रिक हजेरी बंद झाल्याने "लेट लतीफ' कर्मचाऱ्यांना काही कालावधीसाठी का होईना, दिलासा मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT