birds 
पश्चिम महाराष्ट्र

हिप्परगा तलाव परिसरात भरलीय पक्ष्यांची जत्रा 

परशुराम कोकणे

सोलापूर : कडाक्‍याच्या थंडीपासून सुटका करून घेण्यासाठी शहरापासून जवळच असलेल्या हिप्परगा तलाव परिसरात फ्लेमिंगो, श्‍वेतबलाक यासह विविध प्रजातींचे पक्षी दाखल झाले आहेत. खाद्य शोधण्यासाठी चालू असलेली पक्ष्यांची हालचाल पाहून जणू पक्ष्यांची .जत्राच भरली की काय, असा भास होत आहे. 

हिवाळ्यात सायबेरियामध्ये कडाक्‍याची थंडी पडते. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीही होते. त्यामुळे या पक्ष्यांना तिथे अन्न मिळत नाही. अन्नाच्या शोधात ते भारतात येतात. मात्र, या प्रवासात त्यांना हिमालय अडथळा ठरतो. उंचावरून त्यांना उडता येत नाही. त्यामुळे ते अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे खैबरखिंडीला वळसा घालून येतात. काही पक्षी नेपाळ, भूतानमार्गेही येतात. यातील लहान आकाराचे पक्षी अंधारात येतात, तर इतर पक्षी दिवसा उजेडात येतात. जवळपास 50 प्रजातींचे पक्षी हिप्परगा तलाव परिसरात दाखल झाले आहेत. पक्षी निरीक्षणासोबतच फोटोग्राफीसाठीही अनेकजण तलाव परिसरात जात आहेत. पक्ष्यांची फोटोग्राफी करताना पक्ष्यांच्या अधिवासाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांनी केले आहे. 

या पक्ष्यांच्या झाल्या नोंदी 
वूली नेकड स्टॉर्क, पेंटेड स्टॉर्क, कॉमन क्रेन, लिटल कॉरमोरन्टस, कुट्‌स, परिह काईट्‌स, इग्रेट्‌स, ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन, रिव्हर टर्न्स, कॉमन टर्न्स, गल पक्षी, यलो वॅगटेल, लिटल स्टिन्ट्‌स, ड्रॉन्गो, स्टील्टस, श्‍वेतबलाक, पाईड ऍओसे आणि कॉमन शेल्डडक यासह अनेक पक्षी हिप्परगा तलाव परिसरात दिसून येत आहेत. 

हे आहे खाद्य 
या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांसाठी मासे मुख्यतः चिलापी हे खाद्य येथे भरपूर आहे. शेवाळ, किडे, खेकडे, गोगलगायी, अळ्या खाण्यासाठी हे पक्षी येथे येतात. पाणी उथळ आहे, त्याचा फायदा ते घेतात असे दिसून येते. 

हिप्परगा तलावच्या काठावर पाणी कमी झाल्याने पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास निर्माण झाला आहे. पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्यांनी पक्ष्यांपासून काही अंतर ठेवून निरीक्षण करावे. पक्षी निरीक्षणासाठी चांगली दुर्बीण वापरावी. फोटो काढतानाही विशेष दक्षता घ्यावी. पक्ष्यांच्या वेगळ्या हालचाली टिपण्याच्या नादात अधिवासाला धोका पोचवू नये. 
- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक 

हिप्परगा तलाव परिसरात श्‍वेतबलाक, पाईड ऍओसे आणि कॉमन शेल्डडक या पक्ष्यांच्या नोंद पहिल्यांदाच नोंदविल्या गेल्या आहेत. लक्ष वेधून घेणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तलाव परिसरात फ्लेमिंगोचे थवे दिसून येत आहेत. पहिल्यांदाच दिसलेल्या श्‍वेतबलाक पक्ष्याची संख्या एक ते दोनच नोंदविली गेली आहे. 
- अमोल मिस्कीन, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT