Birth and death records are now in the hospital belgum news
Birth and death records are now in the hospital belgum news 
पश्चिम महाराष्ट्र

जन्म-मृत्यू नोंद आता रुग्णालयातच...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - शहरातील रुग्णालयात होणाऱ्या जन्म व मृत्यूची नोंद त्याच रुग्णालयात ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. शहरातील दहा प्रमुख रुग्णालयांत १  फेब्रुवारीपासून ही ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. मार्चच्या अखेरपर्यंत शहरातील सर्व रुग्णालयांत ही नोंदणी सुरू होणार आहे.

महापालिकेवरील ताण होणार कमी

सध्या शहरातील रुग्णालयांमधून जन्म व मृत्यूची नोंद महापालिकेला पाठविली जाते. त्यानंतर महापालिकेकडून त्या माहितीची ऑनलाईन नोंद केली जाते. मात्र, एप्रिलपासून जन्म व मृत्यू नोंद महापालिकेला करावी लागणार नाही. रुग्णालयांकडून होणाऱ्या नोंदणीलाच महापालिकेकडून अंतिम मंजुरी दिली जाईल. मात्र, जन्म व मृत्यू दाखल्यांचे वितरण महापालिकेकडूनच केले जाईल. नव्या योजनेमुळे जन्म-मृत्यू नोंदणीच्या कामाचा महापालिकेवरील ताण कमी होईल. तसेच, जन्म व मृत्यू दाखल्यांच्या वितरणाला होणारा विलंब टळेल.

ई-जन्म या नावाचे वेब पोर्टल सुरु

जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी राज्य शासनाने ई-जन्म या नावाचे वेब पोर्टल सुरु केले आहे. राज्यभरातील सर्व जन्म व मृत्यूची नोंद संबंधित नगर स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय या पोर्टलवर केली जाते. बेळगाव शहरातील १३० रुग्णालयांच्या व्यवस्थापन मंडळाला ई-जन्म पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. त्यापैकी १० रुग्णालयांना आधीच युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २४) महापालिकेत झालेल्या कार्यशाळेत या १० व अन्य ३० अशा ४० रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जिल्हा सांख्यिकीय विभागातील अधिकारी गोपाळ सुगते यांनी ई-जन्म पोर्टलची माहिती व प्रशिक्षण दिले. पोर्टल कसे हाताळायचे, जन्म व मृत्यू नोंद कशी करावी. माहिती नोंद करताना संबंधितांचे आधार कार्ड किंवा अन्य कागदपत्रांची पडताळणी कशी करावी. नव्याने जन्माला आलेल्या बाळाची नोंद करताना आधार कार्डनुसार त्याच्या पालकांच्या नावांची नोंद करणे, मृत झालेल्या व्यक्तीची नोंदही आधार कार्डवरील नावाच्या आधारे करावे, याबाबत त्यांनी सांगितले. एकदा रुग्णालयाकडून नोंद झाली की महापालिकेकडून पडताळणी होऊन त्याला मंजुरी दिली जाईल. तीच नोंद महापालिकेकडे कायम राहिल. त्यानंतर मागणीप्रमाणे संबंधितांना जन्म किंवा मृत्यू दाखला दिला जाईल असे सुगते यांनी सांगितले. या कार्यक्रमात महापालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनीही मार्गदर्शन केले.

सांख्यिकीय विभागाकडून हाताळणी

ई-जन्म हे पोर्टल सांख्यिकीय विभागाकडून हाताळले जाते. त्यामुळे, यासंदर्भात काही अडचण असेल तर सांख्यिकीय विभागाकडून ती सोडविली जाईल. टप्प्याटप्याने शहरातील सर्व रुग्णालयांत जन्म व मृत्यूची ऑनलाईन नोंदणी सुरू होईल, अशी माहिती डॉ. डुमगोळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT