Bison esakal
पश्चिम महाराष्ट्र

गव्याच्या एंट्रीने सांगली मार्केट यार्डात जमावबंदीचे आदेश

षी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गाव्याला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : गेल्या तीन दिवसापासून सांगली (Sangli) वाडी परिसरात दिसणारा महाकाय गवा आज पहाटे शहराच्या दिशेने आला. आयर्विन पुल (Irwin Bridge) परिसरातून गणपती पेठ, वखारभाग, एसएफसी मॉल, सावली बेघर निवारा केंद्र त्यानंतर मार्केट यार्ड परिसरात गवा दिसून आला. मार्केट यार्ड परिसरातील वेअर हाऊस परिसरात पहाटे पाच वाजता गवा (Bison) दिसून आला असून, या ठिकाणी तात्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे. तहसीलदार यांनी मार्केट यार्ड परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केले आहे आहेत.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गाव्याला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी केली.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक निरीक्षक अमित कुमार पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील यांच्यासह प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, कौस्तुभ पोळ, तबरेज खान, निखिल शिंदे अनेक प्राणी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत.

सांगली शहरातील आसपास गेल्या दोन दिवसांपासून गवा रेडा फिरत आहे. आज पहाटेच्या सुमारास गवा रेड्यानं सांगली शहरात एन्ट्री केली. आणि सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट मध्ये गवा रेडा घुसला आहे. त्यामुळे परिसर बंद करण्यात आला आहे. गाव्याला पाहण्यासाठी मार्केट यार्ड समोर बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आज सकाळपासून मार्केटयार्ड परिसरातील दोन्ही मुख्य प्रवेश द्वार बंद करण्यात आले असून, सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी आठच्या सुमारास सारा मार्केट परिसर शांत होत बाजार समितीच्या अधिकारी संचालकांनी घटनास्थळी धाव घेत बंदचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND A vs SA A 1st Test: विराटची कसोटीतील जागा रिषभ पंतला मिळाली? फोटोमुळे चर्चा; मुंबईच्या गोलंदाजाने गाजवला पहिला दिवस

Latest Marathi News Live Update : राजवी अॅग्रो पाॅवर प्रा. लि. या साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात ३००१ रूपये प्रति मेट्रिक टन उस दर जाहीर केला

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

SCROLL FOR NEXT