bison seen in kandarwadi village people fear incidence in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

गवा खरंच आलाय रे! एप्रिल फूल म्हणून दुर्लक्ष केलं पण नंतर घाबरगुंडी

बाळासाहेब गणे

तुंग (सांगली) : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील लाड मळा व आवटी मळा या परिसरामध्ये गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास गव्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले. कालच सांगलीमध्ये बिबट्या जेरबंद झाला तर तासगांवमध्ये गव्याला हुसकावून लावण्यात आले. वन्यप्राण्यांचे मानवी वसाहतीमध्ये दर्शन होत असतानाच कारंदवाडी येथील गावच्या दक्षिणेस मळ भाग परिसरात व नदी बाजूच्या परिसरात याचे दर्शन झाले. शेतात गेलेल्या मजुरांना आणि मर्दवाडीतुन शेतात येणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना गवा दिसला. 

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या मजुरांना गवा दिसताच ही बातमी गावात पसरली. परंतु आज १ एप्रिल असल्याने एप्रिलफुल करत आसावेत म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले. परंतु शेतातल्या वावरासह गव्याचा फोटो सोशल मिडीयावर दिसताच त्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी होऊ लागली. परिसरात राहत असलेल्या लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. माणसांची गर्दी व आवाजाने गव्याने मर्दवाडीच्या दिशेने मळी भागातील परिसरात धूम ठोकली. या घटनेने गावात दिवसभर गवा आणि एप्रिलफूल यांची चर्चा रंगली. पण प्रत्यक्ष आपल्या भागात गवा आल्याचे निष्पन्न होताच ग्रामस्थांना सांगलीच्या जेरबंद केलेल्या बिबट्याची आठवण झाली. शिराळा वन विभागाला सांगली वनविभागातुन यासंबधीची माहिती देण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT