शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? - भाजप

सकाळ वृत्तसेवा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि शाई फेकल्याची घटना घडली. सोमय्या यांनी शिवसनेच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप लावला. त्यावरुनच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी वाशिम दौऱ्यावर असणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी टार्गेट केलं. सोमय्या यांनी वाशिममध्ये घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमांतून सांगितला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी सेनेवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?, असा टीकेचा बाण चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर सोडला.

सोमय्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. 'वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!', असं ट्विट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणालेत की, “जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.”

काय आहे प्रकरण?

भाजपते नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर आहेत. सोमय्या यांनी ट्विटरवरुन , शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा 100 कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांना टार्गेट केलं. यावरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT