पश्चिम महाराष्ट्र

भाजप वाढविणार उदयनराजेंसमोर अडचणी?

सकाळवृत्तसेवा

सातारा - भाजपची जिल्ह्यातील वाढती ताकद उदयनराजेंच्या अडचणी वाढविणाऱ्या आहेत, हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न नरेंद्र पाटील व अन्य हालचालींतून भाजपकडून सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मांडले जाणारे हे आडाखे व व्यूहरचना खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोरील अडचणी खरोखरच वाढविणाऱ्या ठरतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघात वातावरण ढवळून निघाले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेकांनी तिकीट आपल्यालाच मिळणार, या आशेवर मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हेच विक्रमी मतांनी विजयी झालेले आहेत. आता ते तिसऱ्यांदा येथून निवडून येऊन ‘हॅट्ट्रिक’ करण्याच्या तयारीत आहेत. पण, त्यांना पक्षातूनच विरोध होऊ लागल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याविषयी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी शिवसेना व भाजपकडून त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. पण, भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्यालाच तिकीट मिळेल, या आशेवर मतदारसंघात जोरदार संपर्क मोहीम सुरू केली आहे. उदयनराजेंवर आरोप करू लागले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा कायम ठेवत सक्षम उमेदवार देण्याची भाषा करत आहेत. यातून जागा आपल्याकडे नसतानाही मतदारसंघामध्ये पक्षाची चर्चा सुरू ठेवण्याची खेळी भाजपकडून सुरू आहे. भाजपची जिल्ह्यात ताकद किती वाढली आहे आणि उदयनराजेंविरोधकांकडून कसे बळ मिळेल, हे दाखविण्याचा एकही प्रयत्न भाजपकडून केला जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात वातावरण निर्मिती सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांना युतीचा उमेदवार म्हणून पुढे आणल्यास पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्‍वर व वाई तालुक्‍यांतील माथाडींची मते त्यांच्याच पारड्यात जातील. या तालुक्‍यांतील पक्षाबरोबरच उदयनराजेंच्या विरोधात नाराज असलेल्यांची मते ते घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यातून ‘मिसळ’यानच्या माध्यमातून सातारा व जावळी आणि शशिकांत शिंदेही मदत करतील, असे म्हणत जावळी व कोरेगाव तालुक्‍यांतील मतेही मिळतील, अशी गणिते मांडली जात आहेत. त्याचाच दुसरा भाग म्हणजे माजी आमदार मदन भोसले यांच्यासाठी टाकलेला गळ. 

येत्या आठ किंवा नऊ मार्चला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत किसन वीर कारखान्यावर होणाऱ्या डिस्टिलरीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्यातून वाई मतदारसंघात पक्षाची ताकद वाढणारे हेच भाजपला दाखवून द्यायचे आहे. तसेच आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, हेही सूचीत करण्याचा हा एक प्रकार समजला जात आहे.

भाजपची ही प्रत्येक तालुक्‍यातील मतांची मांडणी कागदावर खरोखरच अत्यंत आशादायक आहे. ही सगळी गणिते जुळून आल्यास उदयनराजेंसमोर नक्कीच अडचण निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादीमध्ये उदयनराजेंना अंतर्गत असलेला विरोध व त्याचे झालेले जाहीर पातळीवरील प्रदर्शन त्यासाठी साह्य करणारे ठरणार आहे. परंतु, भाजपला खरोखर 

नरेंद्र पाटील यांचे कार्ड चार्ज करायचे आहे की   उदयनराजेंना आपल्या कळपात घेण्यासाठी चाललेला हा एक प्रयत्न आहे, याबाबत अद्याप लोकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पक्की मांड ठोकायची असेल तर, भाजपला ठोस भूमिका घ्यावी लागेल तसेच ती निभवावी लागणार आहे. त्यातून उदयनराजेंच्या खासदारकीसमोरील अडचणी खरोखर वाढणार का, हे निश्‍चित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT