modi 
पश्चिम महाराष्ट्र

मोदी, शहांना शिव्या देणारा भाजपचा आमदार झाला; या महिला भाजप नेत्याची टीका

सकाळवृत्तसेवा

सांगली ः विधान परिषदेवर गोपीचंद पडळकर यांना संधी दिली गेली. त्यांचे कर्तत्व काय आहे? हे कुणी ठरवले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हाला वेगळीच नावे सांगितली होती. त्या नावांचे काय झाले? चंद्रकांतदादा केवळ रबरी स्टॅंम्प आहेत का, अशी जोरदार टीका भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना केली.


नीता केळकर यांनी दीर्घ काळापासून विधान परिषदेसाठी संधी शोधत आल्या आहेत, मात्र प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आले. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली होती. त्याविषयी त्या म्हणाल्या, ""मी चंद्रकांतदादा पाटील यांना भेटायला गेले. त्यांना यावेळी संधी मिळेल का, असे विचारले. त्यांनी एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे निश्‍चित झाल्याचे सांगितले. शिवाय, चौथे नाव म्हणून नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तीचा विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले. अशा मोठ्या नावांच्या यादीत तुम्ही कशाला स्पर्धा करता, असेही दादा म्हणाले. त्यामुळे आम्ही गप्प बसलो. आता यादी समोर आल्यावर धक्काच बसला. गोपीचंद पडळकर यांचे कर्तृत्व काय आहे? त्यांनी पक्षासाठी काय केले आहे? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिव्या देणारा माणूस तुम्ही आमदार करता. त्यांची भाषणे काढून ऐका. एवढेच कशाला देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी काय भाषा वापरली होती पहा.

त्यांनी बारामतीतून विधानसभा लढवली हे कसले कर्तृत्व. त्यात त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती. त्याआधी भाजपच्या अनेक निष्ठावंतांनी बारामती लढवली होती. त्यांना बरे न्याय दिला नाही. चंद्रकांत पाटील यांना याची काहीच माहिती नसेल तर मग ते रबरी शिक्का आहेत का? असा मला प्रश्‍न पडतो.''


त्या म्हणाल्या, ""भाजप आम्हाला गृहित धरत आला आहे. हे बंड करत नाहीत, पक्ष सोडत नाही. एका झेंड्याखाली राहून काम करतात. अगदी नाराज झालेच तर काय करतील. काही केलेच तर फार काय परिणाम होईल, असा विचार पक्ष करत असावा. तो खराही आहे थोडाफार. कारण आम्ही पक्षाचे कट्टर समर्थक आहोत. आम्ही महापुरात काम करतो, कीट वाटतो, मास्क वाटतो. सतरंज्या उचलतो. आम्ही पक्षाचे हमालच आहोत.''
----------
देशमुखांना का संधी ?

नीता केळकर म्हणाले, ""शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर दहा महिन्यांपूर्वी रिक्त झालेल्या जागेवरून लढण्याची मी इच्छा व्यक्त केली होती. फडणवीस यांना भेटले. सत्यजीत देशमुखांना पक्षात घेऊन आमदार करणार असाल तर हरकत नाही, मात्र ते आले नाहीत तर मात्र सांगलीची जागा म्हणून ती मला लढू द्या, अशी विनंती केली. त्याची दखल घेतली नाही. पृथ्वीराज देशमुखांना आमदार केले. नेमके काय साध्य झाले?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT