पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : माढ्यात भाजप नेतेच सांगतात घडाळ्याला मत द्या

मनोज गायकवाड

अकलूज: माढा लोकसभेची जागा पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली असली तरी, भाजपचे स्थानिक नेते मात्र सभांमधून घड्याळाला मत द्या असे अवाहन करीत आहेत. त्यामुळे माढ्यात काय होणार याची उत्सुकता वाढली आहे.

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस मधील दिग्गज नेत्यांना भाजपत आणून मुख्यमंत्र्यांनी माढ्यात ताकत वाढवली आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांना सुध्दा त्यांनी आपल्या सोबत घेतले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या समविचारी गटातील सर्व नेते भाजपच्या मंचावर आणून समविचारी गटातील रणजितसिंह निंबाळकर यांना येथील उमेदवारी दिली आहे. माण खटावचे कॉग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे या दोघा बंधूनी भाजपला उघड पाठिंबा दिला आहे. हे सर्व करीत असताना मुळच्या भाजपमधील सहकाऱ्यांना देखील पक्षात कायम ठेवत मुख्यमंत्र्यांनी आपले कौशल्य सिध्द केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत माढ्यात परिवर्तन घडवायचे या इराद्याने अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली आहे. या सभेला महायुतीचे नेते महादेव जानकर, रामदास आठवले, सदाभाऊ खोत, निलम गोरे, यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि मतदारसंघातील दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेत माढ्यात भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपच्या स्तरावर हा विश्वास व्यक्त होत असला तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळी असल्याची चाहूल भाजपच्या नेत्यांना लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात साशंकतेची भावना निर्माण झाल्याचे दिसत आहे. माढ्यात आपले काय होणार? या चिंतेने भाजपच्या नेत्यांना घेरले आहे. राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा सतत विचार डोक्यात घोळत असल्याने त्यांच्या ओठातून राष्ट्रवादीला मतदान करण्याची भाषा बाहेर पडू लागली आहे. हे अनावधानाने घडत असले तरी त्यातून मतदारांच्या मनातील भावनाच भाजपचे नेते व्यक्त करु लागले आहेत असा सार्वत्रिक सूर उमटू लागला आहे.

फलटण येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेत बोलताना रामदास आठवले यांनी रामराजांच्या (राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर) मागे खंबीरपणे उभे रहाण्याचे अवाहन करुन मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारालाही धक्का दिला. चूक लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव केली मात्र, आठवले खरे बोलले. असा सूर त्यानंतर उमटला आहे. सांगोला येथील सभेत बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घड्याळाला मतदान करण्याचे अवाहन केले. अनेक दिवस राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये असल्यामुळे अनावधानाने हे घडल्याची भावना आपल्या देहबोलीतून त्यांनी लगेच व्यक्त केली.

वाडीकुरोली येथे कल्याण काळेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वाडीकुरोली येथील मुख्यमंत्र्यांच्या व अकलूज येथील पंतप्रधानांच्या सभेत माजी आमदार शहाजी पाटील यांनी संजयमामा शिंदे हे आपले मित्र आहेत. आम्ही समविचारी त्यानाच खासदार हो म्हणत होतो पण, ते दुसऱ्या बाजूला गेले आहेत. असे सांगितले. संजयमामा माझे मित्र आहेत हा आवर्जून  उल्लेख करण्यामागे त्यांचा हेतू वेगळा आहे असे अनेकजण सांगत आहेत.

आमदार प्रशांत परिचारक आपल्या प्रत्येक भाषणात संजय शिंदेंच्या मैत्रीचा उल्लेख करीत आहेत. मैत्री वेगळी आणि राकारण वेगळे असेही ते सांगत आहेत. बुधवारी (ता. 17) संध्याकाळी पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे आमदार परिचारक यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना घड्याळाला मतदान करा अन्यथा.... असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्याबरोबर ज्यांना काम करायचे असेल त्यांना उघड घड्याळाचे काम करावे लागेल. ज्यांना घड्याळाच काम करायच असेल त्यांनी कराव, मी पुन्हा त्यांना विचारायला येणार नाही.

अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. त्यामुळे, कालचे एकमेकांचे कट्टर विरोधक एका मंचावर हितगुज करु लागले आहेत. सगळा विरोध मावळल्याची भाजपची धारणा झाली आहे मात्र, विरोधी विचारधारा असणारी मंडळी केवळ अपरिहार्यतेमुळे एकत्र दिसत आहेत. मंचावर हस्तांदोलने होत असली, ओठावर स्वागताचे हास्य दिसत असले तरी त्यांच्या मनात मात्र वेगळीच भावना आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे. विरोधी विचारधारेच्या नेत्यांचे एकत्र येणे त्यांच्या समर्थकानाही रीचताना दिसत नाही. आशातच आता भाजपचे नेते घड्याळाला मतदान करायला सांगू लागले आहेत. यातूनच माढ्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT