vishwajeet.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपने राज्याला सोडले वाऱ्यावर : विश्‍वजित कदम

सकाळवृत्तसेवा

सांगली-संकटातही राज्य सरकार शर्थीने राज्यातील शेतकरी-मजूरांसाठी मदतकार्य करीत आहे. कोरोना आपत्तीविरोधातील लढा एकत्रितपणे लढण्याऐवजी राज्यातील भाजप नेते पंतप्रधान निधीला मदत करीत राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडतात, अशी टीका राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी आज येथे केले. 


ते म्हणाले, ""राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांची टीका आश्‍चर्यकारक आहे. महापुराच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली, हे माहित आहे. आता तर राज्यावरच संकट ओढवले आहे. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावाही केंद्र सरकारने थकवला आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूसही मुख्यमंत्री निधीला मदत देत आहे; मात्र राज्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी राज्याला वाऱ्यावर सोडून केंद्राला मदत देत आहेत. केंद्राने मदत द्यावी, यासाठी चकार शब्द काढत नाहीत मात्र राज्याने मदत करावी, यासाठी आंदोलने करीत आहेत.

त्याऐवजी त्यांनी केंद्राकडून राज्यात जास्तीत जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलिस, प्रशासन, लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. किरकोळ आंदोलनातून राजकारण टाळावे.'' 


महापौर-आयुक्त वाद किरकोळ 
महापौर गीता सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस दोघेही कोरोनाच्या लढाईत चांगले काम करीत आहेत. काही निर्णयाबाबत वेगवेगळी भूमिका असू शकते. एखाद्या कुटुंबातील वादासारखा हा किरकोळ वाद आहे. त्याबद्दल चर्चा झाली आहे. तो संपून जाईल, असे मंत्री कदम यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT