पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : शिवसेनेसोबत फ्रेंडसशीपसाठी भाजपकडून हात पुढे 

सकाळवृत्तसेवा

नगर : भारतीय जनता पक्षाने पुन्हा शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज त्यांचे एकेक शिवसेनेशी सलगीचे विधान करीत आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्यापि कोणताच जवाब येत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला काहीच हरकत नाही, असे विधान करून खडा टाकला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी नगरचे आमदार, मंत्री उपस्थित होते. त्या बैठकीत आमदार राधाकृष्ण विखे यांनी आवर्जून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याचे साक्षीदार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. ते छायाचित्र रात्री उशिरा सोशल मीडियात शेअर झाले. त्या छायाचित्राचा हवा तसा अर्थ काढला जात होता. त्यामुळेही भाजप-सैनेच्या फ्रेंडसशीपबद्दल चर्चा वाढली आहे. 
भाजप आणि शिवसेना हे दोन्ही नैसर्गिक मित्र आहेत, त्यामुळे एकत्र यायला काहीच हरकत नाही, असे विधान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने चर्चेला ऊत आला आहे. 
विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना वरील भावना व्यक्त केली. 

शिवसेनेने प्रस्ताव द्यावा, आम्ही रेडी 
शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी उद्याही प्रस्ताव दिला, तर त्याचे स्वागतच केले जाईल. आमची त्यास कोणतीही अडचण राहणार नाही. आमच्या मित्रासोबत आम्हाला जुळवून घ्यायला काहीच अडथळा येणार नाही. सुबह का भुला शाम को घर आया, अशी हिंदीतील शायरी करीत आपल्या भावना शिवसेनेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. आता विखे पाटील यांनीही तोच राग आळवला आहे. एकंदरीत भाजप ही शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चाचपणी करीत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. 

भीमा-कोरेगावचा तपास केंद्र सरकार करीत आहे. एनआयएकडे तपास करणार आहे, ही स्वायत्त तपास यंत्रणा आहे. त्यामुळे राज्य सरकारने आश्‍चर्य वाटून घ्यायचे कारण नाही, असेही विखे पाटील यांनी मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड हे कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीका करतात आणि कॉंग्रेस नेते ते निमूटपणे ऐकून घेतात, याचे विशेष वाटते. खरं तर कॉंग्रेसने या सरकारमधून बाहेर पडायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT