With BJP taluka president Five arrested in Borgaon assault case
With BJP taluka president Five arrested in Borgaon assault case 
पश्चिम महाराष्ट्र

बोरगाव मारहाण प्रकरणी भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांना अटक

शम्मु मुल्ला

शिरढोण (जि. सांगली) : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील उपसरपंच निवडीवेळी झालेल्या हाणामारीत पांडुरंग जनार्दन काळे (वय 58) या ग्रामपंचायत सदस्य मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्ष कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील यांच्यासह पाच जणांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की बोरगाव येथील उपसरपंच नामदेव पाटील यांनी आपल्या पदाचा महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. या पदासाठी फोडाफोडीचे मोठे राजकारण झाल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. काही ग्रामपंचायत सदस्य फुटल्याने वातावरण चांगलेच तापले होते. या पदासाठी गणपती पाटील व सुजित पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. 4 मार्चला उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार होती. त्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. 

याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य फुटीच्या कारणावरून दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. यात पांडुरंग काळे या ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले होते. या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 14 पर्यंत पोचली आहे, तर अजून 25 जण फरारी आहेत. बोरगाव येथील 36 जण व मनेराजुरीचे तिघे अशा एकूण 39 जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

याआधी माजी सरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील, नंदकुमार पाटील आदी नऊ जणांना अटक केली होती. काल (ता. 15) आणखी पाच जणांना अटक केली आहे. यात भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील, अनिल ज्ञानू शिंदे, संतोष शंकर पाटील, प्रवीण जनार्दन पाटील, युवराज आनंदराव पाटील यांचा समावेश आहे.

त्यांना आज न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणातील फरारी इतर संशयितांनाही लवकरच अटक करू, असा विश्वास जत विभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी व्यक्त केला आहे. 

संपादन : युवराज यादव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT