BJP will kill those who cut electricity bills in pairs in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

वीजबिल कट करणाऱ्यास भाजप जोड्यानेच मारणार

अजित झळके

सांगली : कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करू, असे आश्‍वासन देऊन पलटी खाणाऱ्या राज्य सरकारने आता थकबाकीपोटी वीज कनेक्‍शन तोडले जाईल, असा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वांचीच परिस्थिती बिकट बनली होती. त्याचा विचार न करता शासनाने वीज कनेक्‍शन कट करण्याचे दिलेले आदेश तुघलकी आहेत. त्यामुळे वीज कनेक्‍शन कट करायला येणाऱ्यास भाजप जोड्याने मारेल, असा इशारा भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले,""या आंदोलनासाठी वीस जणांची टीम तयार केली आहे. कोरोनामुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली होती, त्यातच विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. राज्य सरकारने या काळातील बिले माफ करणार असल्याचे सांगितले होते.

अडचणीच्या काळात जनतेला आधार व मदतीची गरज असताना शासनाने थकबाकी असणाऱ्यांचे वीज कनेक्‍शन कट करण्याचे आदेश दिले आहेत. जखमेवर मीठ चोळले आहे. ही हुकूमशाही आहे. मोदी सरकारने सर्वांना या काळात धान्य व पैसे दिले. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही जनतेला दिलासा द्यावा.'' 

ते म्हणाले,""आमच्या टीममध्ये दीपक माने, श्रीकांत वाघमोडे, राजू जाधव, अमित भोसले, राहुल माने, प्रियानंद कांबळे, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, संगीता जाधव, प्रथमेश वैद्य, अक्षय पाटील, सचिन ओमासे, राजू मद्रासी, सागर इरकर, अनिकेत खिलारे, अण्णासाहेब वडर, संदीप थोरात, गिरीश रणखांबे, राहुल रुपनर, कार्तिक मोरे यांचा समावेश आहे.

वीज कनेक्‍शन कट करू नये यासाठी आम्ही वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता याना निवेदन दिले. तरीही वसुलीची सक्ती झाली तर पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवून. त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.'' 

संपादन :  युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : पशुखाद्य प्रकल्प लवकरच सुरू होणार, नितीन गडकरी , दुष्काळी परिस्थितीत पशुसंगोपन विषयावर कार्यशाळा

Nagpur Farmers : रिंगरोडग्रस्तांना नवीन नागपुरात हक्काचे भूखंड द्या ,प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग २०२८ पर्यंत लांबणीवर पडल्यास सरकारवर ३ लाख कोटींचा अतिरिक्त बोजा

Latest Marathi News Live Update : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक; चार लोकल रद्द

IND vs NZ 2nd Test Live: २९२ चेंडूंनंतर विकेट... जसप्रीत बुमराहचा 'डान्स' पाहिलात का? भन्नाट रिटर्न कॅचनंतर केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा, Video Viral

SCROLL FOR NEXT