पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेत भाजप सदस्यांचा बंडाचा पवित्रा 

सकाळवृत्तसेवा

सांगली - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी बदला, अन्यथा आठ दिवस वाट पाहून आम्ही राजकीय भूकंप घडवू, असा इशारा देत भाजपच्या सदस्यांनी बंडाचे निशाण फडकावले.

आज अकरा सदस्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सव्वा वर्षात पदाधिकारी बदलाचा शब्द दिला होता, ते पाळत नसतील तर आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल, अशी टोकाची भूमिका जाहीर केली. 

सदस्य शिवाजी डोंगरे, विद्या डोंगरे, शोभा कांबळे, सरदार पाटील, मनोजकुमार मुंडगनूर, रेखा बागेळी, प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर हे सदस्य प्रत्यक्ष हजर होते. प्राजक्ता कोरे, सरीता कोरबू, स्नेहलता जाधव यांच्यातर्फे त्यांचे प्रतिनिधी हजर होते. शिवाय, अजितराव घोरपडे समर्थक आशा पाटील, संगीता नलवडे; खासदार संजय पाटील समर्थक डी. के. पाटील, खासदार राजू शेट्टी समर्थक सुरेखा आडमुठे या सदस्यांनी पदाधिकारी बदलासाठी पाठींब्याचे पत्र दिले आहे. या सर्व पत्रांसह एक संयुक्त निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन आठ दिवसानंतर राजकीय भूकंप घडवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""जिल्हा परिषदेत भाजपचा सत्ता आहे. सव्वा वर्षाने अध्यक्ष, पदाधिकारी बदलायचे ठरले होते. तसा शब्द दिला होता. त्याला तीन महिने जास्त झाले. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांना भेटून अध्यक्ष, पदाधिकारी बदलाची मागणी केली आहे. त्यांनी ग्वाही दिली, मात्र पृथ्वीराज देशमुख चुकीची माहिती वर पोहचवत आहेत. पडळकर आमच्यासोबत आहेत. घोरपडे यांच्या सदस्यांनी पाठींबा दिला आहे. मग उगाच बाऊ का केला जातोय. सदस्य संख्येच्या आकड्यांबाबत चुकीची माहिती देण्याचे कारण नाही. संख्याबळ भक्कम आहे. त्याची कुणी काळजी करू नये. आम्ही बंड करायला मागे पाहणार नाही. जिल्हा परिषदेत भूकंप घडेलच.'' 

नेत्यांना कल्पना नाही 
जिल्हा परिषद सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावताना आमदार विलासराव जगताप, खासदार संजय पाटील यांना कल्पना दिलेली नाही. याआधीच त्यांना सांगितले होते. यावेळी कानावर घातलेले नाहीत, असे सदस्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT