The body of a young man was found in a car at Sangli; Car is off Ichalkaranji
The body of a young man was found in a car at Sangli; Car is off Ichalkaranji 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली येथे मोटारीत सापडला तरुणाचा मृतदेह; मोटार इचलकरंजीची

शैलेश पेटकर

सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ (एमएच 12, एएन 6059) या चारचाकीत अंदाजे 35 ते 40 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती समजल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अद्याप मृत युवकाची ओळख पटली नाही. दरम्यान, तरुणाचा नैसर्गिक मृत्यू की घातपात आहे? हे अद्याप स्पष्ट नाही. 


याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ सांगलीच्या दिशेने तोंड असलेल्या मोटारीत आज दुपारी एका युवकाचा मृतदेह सापडला. चारकीत पुढे आणि मागे "प्रेस' अशी अक्षरे लिहिली आहेत.

तसेच मृत तरुण चालकाशेजारी असलेल्या सीटजवळ मोटारीतील डॅशबोर्डवर पाय टाकून मृतावस्थेत आढळून आला. चालकाच्या सीटवर विस्कटलेल्या अवस्थेतील उशी मिळाली असून, तेथेच एक चप्पल जोड आढळली आहे. तरुण मृत होऊन बारा तासांपेक्षा जास्त कालावधी झाल्याचे सांगण्यात आले. 


काल सायंकाळी ही मोटार त्या परिसरात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अद्याप समजले नाही. त्याची ओळखही पटली नाही. माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे. 


मोटार इचलकरंजीची 
प्राथमिक तपासात मोटारीच्या क्रमांकावरून ही गाडी इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथील असल्याचे समोर आले आहे. गाडीचा मालक कोण याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मुख्य रस्त्यावर तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT