पश्चिम महाराष्ट्र

नागनाथअण्णांचे कार्य लवकरच पुस्तकरूपात

प्रमोद फरांदे

कोल्हापूर - सत्यशोधक नागनाथअण्णा नायकवडी म्हणजे प्रखर देशभक्त आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारलेल्या समाजनिर्मितीसाठी आयुष्य वाहिलेले व्यक्‍तिमत्त्व. अण्णांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी आहे.

अण्णांचे क्रांतिकारी कार्य शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नागनाथअण्णा नायकवडी’ या नावाने पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित होत आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदा पारेकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कोल्हापूरच्या शासकीय मुद्रणालयात त्याची छपाई झाली असून मुंबईत मुखपृष्ठाचे काम सुरू आहे.  

गरीब कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील नागनाथअण्णांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या कुंडात उडी घेतली. प्रतिसरकारच्या काळात अण्णा आणि जी. डी. लाड हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे बिनीचे शिलेदार होते. अण्णांनी स्वातंत्र्यानंतर समाजबदलासाठी, समाज उभारणीसाठी जे कार्य केले, त्यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. दुष्काळी पट्ट्यात पाणी चळवळ उभारून लोकांना लढण्यासाठी दिलेली प्रेरणा, दलित व्यक्तीला कारखान्याचा अध्यक्ष करणे, कष्टकरी - उपेक्षितांच्या चळवळींना दिलेले बळ आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

अण्णांनी स्वातंत्र्यानंतर जी विधायक कामे केली आहेत, ती आजच्या काळात फार उपयुक्त आहेत. त्यावर या पुस्तकात अधिक प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य वाचकाला अण्णा समजावेत अशी साधी, सोपी भाषा वापरली आहे. 
- नंदा पारेकर
, विभागप्रमुख, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: आरबीआयचा दणका! मुंबईतील 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, कोणत्या ग्राहकांना पूर्ण पैसे मिळणार?

3 वर्षे लग्न लपवून ठेवलं अन्…; सैराट फेम अरबाज शेखची हटके लव्हस्टोरी, म्हणाला...'कोर्ट मॅरेज करुन घरच्यांना...'

आरोग्यमंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यात चाललंय काय? उपचाराचं बिल मंजुरीसाठी लाच, अधीक्षकाला अटक

२०२७पर्यंत फक्त ३६ विवाह मुहूर्त; १७ मे ते १५ जूनपर्यंत मंगलकार्याला ब्रेक; वाचा कधी आहेत मुहूर्त?

प्रतीक यादवचं निधन कोणत्या आजाराने? मुंबईतही घेतलेले उपचार, ३ दिवसांपूर्वी मेदांता रुग्णालयातही केलं होतं दाखल

SCROLL FOR NEXT