Borgaon, Nimbalak area cold havoc; The fires ignited 
पश्चिम महाराष्ट्र

बोरगाव, निंबळक परिसर थंडीचा कहर; शेकोट्या पेटल्या

दिग्विजय साळुंखे

बोरंगाव : बोरगाव, निंबळक परिसरात गेल्या काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेले 3-4 दिवस थंडीचे प्रमाण वाढले आहे. तापमान कमालीचे खाली आले आहे. दिवळीपासून थंडीची सुरवात झाली आहे. मात्र थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहिले. गेल्या चार दिवसापासून या थंडीने कहर केला आहे. निंबळक परिसरात थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. 

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व धावपळीमुळे मानवी आरोग्य, सकस आहार अन्‌ व्यायामा अभावी धोक्‍यात येऊ लागले आहेत. कोरोनाच्या महाभयंकर रोगामुळे सर्वच आजारांची भीती लोकांना बसली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, विविध विकार वाढू लागले आहेत. व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहवे म्हणून परिसारत मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. 

सर्वाधिक महिलांची संख्या वाढली आहे. सकाळच्या गुलाबी थंडीत व्यायाम करण्यासाठी सर्वच रस्ते गजबजलेले आहेत. वाढत्या थंडीचे प्रमाण रब्बी पिकांना पोषक ठरणार आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. शेकोटी भवती निवडणुकीच्या गप्पामध्ये रंगलेले दिसून येते आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT