"BOT's proposal disapproved 
पश्चिम महाराष्ट्र

"बीओटी'चा प्रस्ताव नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्हा परिषदेची अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या लाल टाकी येथील जागेचा विकास "बांधा, वापरा, हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर करण्याबाबतचा प्रस्ताव आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. ही जागा जिल्हा परिषदेनेच विकसित करावी, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. 

लाल टाकी परिसरातील जागा विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले टाकली आहेत. त्याबाबतचा विषयही सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. 2011पासून हा "बीओटी'चा घाट घातला जात आहे. सुरवातीला त्याला विरोध झाला होता. त्यानंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला. त्या वेळी जिल्हा परिषदेनेच ही जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा हा विषय आजच्या सभेत मांडून ही जागा "बीओटी' तत्त्वावर विकसित करण्याचा विचार होता.

चर्चेत हे झाले सहभागी

सभेत हा विषय निघताच त्याला सदस्यांनी विरोध केला. ही जागा "बीओटी' तत्त्वावर विकसित करण्याऐवजी जिल्हा परिषदेनेच विकसित करावी, असा मुद्दा जालिंदर वाकचौरे, संदेश कार्ले, रामहरी कातोरे, माधवराव लामखडे, हर्षदा काकडे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांनी हा मुद्दा उचलून धरला.

हा झाला निर्णय

जागा विकसित करायची असेल, तर ती जिल्हा परिषदेने करणे गरजेचे आहे, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. त्यावर लाल टाकीच्या जागेतील विकासकाम जिल्हा परिषदच करील, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी तसे सभागृहात सांगून ठराव झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला. 

"सकाळ'ने केला ऊहापोह! 
"लाल टाकीच्या जागेबाबत पुन्हा "बीओटी'चा प्रस्ताव' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तात हे काम झाल्यानंतर त्यातून किती फायदा होणार, तसेच जुन्या इमारतीवर किती खर्च आणि हा प्रस्ताव कधी-कधी सभागृहापुढे आला होता आदी मुद्यांचा ऊहापोह केला होता. या वृत्ताच्या आधारानेच सदस्यांनी या कामाच्या "बीओटी'ला नकार देऊन ते काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यावर जोर दिला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

Dadoji Konddev statue: ''पुण्यात दादोजी कोंडदेव-गडकरींचा पुतळा पुन्हा बसवा'', सकल ब्राह्मण समाजाची मागणी; शिवसंग्रामचा विरोध

Pune Liquor Case: पुणे विषारी दारु प्रकरणात मोठी अपडेट! दारु विकणाऱ्या राहुल क्षीरसागरचा मृत्यू; प्रकरण सीआयडीकडे जाणार?

Kaygaon News : रात्रीच्या वेळी तीन दुचाकीस्वारांचा पाठलाग; कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाची प्रसंगावधानाने लूटमारीतून सुटका

SCROLL FOR NEXT