crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

मूल होत नसल्याने चार वर्षांच्या रोहितचे अपहरण!

परशुराम कोकणे

सोलापूर : घरात मुलगा असेल तर प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने झांशी (उत्तर प्रदेश) येथील मधू ठाकूर याने सोलापुरातून कोंचीकोरवी गल्लीतील चार वर्षांच्या रोहितचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. ठाकूर यास विजयपूर नाका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांत अटक केली असून रोहितची सुखरूप सुटका करण्यात आली. 

मधू ठाकूर (रा. झांशी, उत्तर प्रदेश) हा 10 वर्षांपूर्वी मौलाली चौक परिसरातील कोंचीकोरवी गल्लीत भाड्याने राहण्यास होता. 17 फेब्रुवारीला मधू ठाकूर हा कोंचीकोरवी गल्लीत ओळखीच्या महिला सुनीता (नाव बदलेले आहे) यांच्याकडे मुक्कामासाठी आला. 18 फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता सुनीता या चार वर्षांचा मुलगा रोहित (नाव बदलेले आहे) यास घेऊन कुमठे येथील मुलीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी ठाकूर याने मीही तुमच्यासोबत येतो. तुमच्या मुलीला भेटून फार दिवस झाले असे तो म्हणाला. त्यानंतर ते तिघे रिक्षाने कुमठे येथील मुलीच्या घरी गेले. तिथे चहापान करत असताना अंदाजे दुपारी तीन वाजता ठाकूर हा मुलगा रोहित यास दुकानातून खाऊ घेऊन देतो असे सांगून फोनवर बोलत बोलत निघून गेला. बराच वेळ झाला तरी मुलगा रोहित आणि ठाकूर परत आले नाही. 

सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगा रोहित सापडला नाही. ठाकूर याने मुलास पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विजयपूर नाका पोलिसांनी शोधमोहिमेला गती दिली. सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने ठाकूरच्या मोबाईलचे लोकेशन तपासात पोलिस पालघरमधील भोईसार परिसरात पोचले. पोलिसांनी साध्या वेषात फिरून तपास केला. 19 फेब्रुवारीला दुपारी पोलिसांनी ठाकूर यास पकडले. त्याच्या ताब्यातून रोहितची सुटका केली. 

ठाकूर व त्याची पत्नी सध्या पालघरमधील भोईसार परिसरात राहण्यास आहेत. मधू हा हॉटेलमध्ये कूकचे काम करतो. त्यांना एक मुलगी आहे. वैद्यकीय कारणामुळे त्यांना दुसरे मूलबाळ होत नाही. तसेच, त्याच्या मूळ गावी झांशीत घरात मुलगा असेल तर प्रतिष्ठेचे मानले जाते. या कारणामुळे ठाकूर याने जुन्या ओळखीचा फायदा घेऊन सोलापुरातून रोहितचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. 
विजयपूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर, कर्मचारी शिवानंद भिमदे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने अपहरण झालेल्या रोहितची सुखरूप सुटका केली. 

घरात मुलगा हवा असल्याने मधू ठाकूर याने सोलापुरातून रोहितचे अपहरण केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांत आम्ही मुलाचा शोध लावला. त्याची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणात ठाकूर याची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. 
- सचिन बनकर, पोलिस उपनिरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT