Breaking: The information about Rohit Pawar, the start of rotation of the Kukdi canal 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग ः कुकडीचे आवर्तन सुटले, रोहित पवार यांची माहिती 

सकाळ वृत्तसेवा

कर्जत: कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे आवर्तन आज (दि. १३) सायंकाळपासुन सुरू होत असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. आवर्तन सुटल्यानंतर पाच ते सहा दिवसांमध्ये ते पाणी करमाळा तालुक्यासाठी जाईल. आठ ते नऊ दिवस करमाळा तालुक्यासाठी हे पाणी राहणार आहे. करमाळा तालुक्यासाठी हे कुकडीचे पाणी दिल्यानंतर म्हणजेच मार्च अखेर हे कुकडीचे पाणी कर्जत तालुक्यासाठी अठरा ते एकोणीस दिवस राहणार अाहे. त्यानंतर इतर तालुक्यासाठी पाण्याचे नियोजन होणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
सीना व कुकडी धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची कोळवडी येथे काही दिवसांपूर्वी पाणी नियोजनाबाबत आवर्तनपुर्व बैठक झाली होती. पुढील आवर्तन हे कधी सोडले जावे? याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती. कुकडी व सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मार्च अखेरीस पाणी सोडले तर शेती पिकांसाठी योग्य राहील अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली होती.

आमदार रोहित पवार व इतर तालुक्यातील आमदारांच्या बैठकीत पाण्याबाबत चर्चा करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडुन आवर्तनासाठी परवानगी मिळाली होती. आमदार रोहित पवार व इतर तालुक्यातील आमदार व जलसंपदा मंत्री तसेच कुकडी व सीना प्रकल्पाचे संबंधित अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही तालुक्यावर पाणी वाटपाबाबत अन्याय होणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यात येईल असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आणि त्याच अनुषंगाने आज पाण्याचे वेळेत आवर्तन सुटले आहे. आमदार रोहित पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे पाण्याचे दुसरे आवर्तनही वेळेत सुटले असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सीनाचेही आवर्तन अठरा तारखेला!
कुकडीचे आवर्तन वेळेत सुटले असुन आता सीना धरणाचे आवर्तनही येत्या अठरा तारखेला सुरू होणार आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य वापर करावा. कोणत्याही पोटचाऱ्यांची मोडतोड करू नये.कुकडीचे टेल-टु-हेड पाणी वाटप होणे गरजेचे आहे. सर्वांना समान पाणी वाटप होईल याकरता सहकार्य करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT