download.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ताजी बातमी ः पलूस  शहरात कोरोनाचा शिरकाव 

सकाळवृत्तसेवा

पलूस ( सांगली) ः अखेर पलूस तालुक्‍यात कोरोनाने प्रवेश केला आहे. मुंबई येथून पलूस शहरात आलेल्या एका 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉंझीटिव्ह आला आहे. हा व्यक्ती ता. 1 जून रोजी आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह पलूस येथील त्याच्या घरात आली होती. त्यांना पलूस येथील शिक्षण संस्थेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉंकडाऊन झालेपासून सुदैवाने पलूस तालुक्‍यात एकही कोरोना पॉंझीटिव्ह रुग्ण सापडला नव्हता. अखेर आज पलूस शहरात एक पॉंझीटिव्ह रुग्ण सापडल्याने , या तालुक्‍याची गणणाही कोरोनाच्या यादीत होणार आहे. 

हा व्यक्ती ता.1 जून रोजी मुंबई ( परेल ) येथून आपल्या कुटुंबाला घेऊन पलूस ( सिध्दार्थ नगर )येथे आली होती. ही खबर पोलीसांना मिळताच या सात जणांच्या कुटुबाला पलूस येथील पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्वारंटाईन कक्षात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.शुक्रवारी आरोग्य विभागाने या सेंटरमधील 26 जणांपैकी 50 वर्षे पेक्षा जास्त वयोगटातील 6 जणांचे स्वॅंप मिरज येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी एकाचा अहवाल पॉंझीटिव्ह आला. शनिवार दुपारी सदर व्यक्तीचा अहवाल पॉझीटिव्ह आलेनंतर, त्या व्यक्तीला मिरज येथील कोरोना उपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. तर सदर कुटुंबातील उर्वरित सहा जणांना पलूस शहराबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तिग्रह येथील विलिगिकरण कक्षात वर्ग करण्यात आले. त्यांचेही स्वॅंप तपासणी साठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, पलूस तालुक्‍यात पहिलाच कोरोना पॉंझीटिव्ह रुग्ण सापडल्याने सर्व शासकीय यंत्रणा आणखी सज्ज झाली आहे. आज दुपारी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार राजेंद्र पोळ, पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव व ईतर विभागाचे अधिकारी यांनी पलूस येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. सदर एरिया कंटेनमेंट झोन पलूस शहरातील काही भाग बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. 

पलूस शहरात प्रथमच कोरोना पॉंझीटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. विशेषतः बाहेरून तालुक्‍यात येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी. त्यांनी क्वारंटाईन व्हावे. 

- राजेंद्र पोळ, तहसीलदार, पलूस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT