Breaking - Two infected children of Jamkhed dead coronavidata infected 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - जामखेडच्या मृत कोरोनाबाधिताच्या दोन मुलांनाही लागण

सकाळ वृत्तसेवा

नगर - जिल्ह्यातील दक्षिण भागात कोरोना हात आणि पाय दोन्ही पसरण्यास सुरूवात केली आहे. जामखेड शहर हॉटस्पॉट जाहीर झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला कोरोना असल्याचे निदर्शनास आले होते. आता तिची दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जामखेड येथील त्या व्यक्तींवर जिल्हा आरोग्य यंत्रणेचा वॉच होता. त्यांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले होते. त्या व्यक्तीच्या २९ व ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात आता बाधितांची संख्या ३१वर गेली आहे. पैकी १८जणांना डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. यात श्रीरामपूरचा तरूणाचा यात समावेश नाही.

दोन दिवसांपूर्वी जामखेड आणि नेवासे येथील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. जामखेड येथील व्यक्तीचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आला नव्हता. मात्र, काल त्याचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे यंत्रणा सतर्क झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

SCROLL FOR NEXT