Bribe  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Bribe News : लाचखोर अधिकारी कांबळे, सोनवणे निलंबित

माध्यमिक शिक्षणधिकारी पदाचा कार्यभार प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

सांगली - लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यावर आज निलंबनाची कारवाई झाली. या दोघांनाही निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, माध्यमिक शिक्षणधिकारी पदाचा कार्यभार प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या आठवड्यात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यांनी तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्या दोघांना लाच स्वीकारताना अटक केली होती. दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश आज निघाले. शिक्षण आयुक्त विशाल मांढरे यांनी ही कारवाई केली. याबाबतचा लेखी आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिला.

दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे या लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी पुढे येत आहेत. आतापर्यंत १२ जणानी पैसे न दिल्याने त्यांची फाईल या अधिकाऱ्यांनी अडवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT