Bribe taker Engineer caught red handed in Islampur Panchayat Samiti bill sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

पंचायत समितीचे बिल काढून देण्यासाठी लाच घेणाऱ्याला इस्लामपुरात रंगेहाथ पकडले!

पंचायत समितीकडे केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी ४८ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या सेवानिवृत्त शाखा अभियंता महादेव विष्णू सुर्यवंशी याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : पंचायत समितीकडे केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी ४८ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या सेवानिवृत्त शाखा अभियंता महादेव विष्णू सुर्यवंशी (वय ५८, रा. यशोधननगर, इस्लामपूर) याला लाच स्विकारताना आज येथे रंगेहाथ पकडण्यात आले. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या घरीच सापळा रचून ही कारवाई केली. संबंधित शासकीय कंत्राटदाराने याप्रकरणी तक्रार केली होती. इस्लामपूर पोलीस ठाण्यात सूर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ मे २०२२ ला एका कामासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालय कारंदवाडी यांच्याकडून कार्यारंभ आदेश मिळाला होता. तक्रारदार कंत्राटदारांने हे काम पुर्ण केले आहे. या कामांची निविदा फाईल तत्कालीन शाखा अभियंता संर्यवंशी यांने स्वतःजवळ ठेवून घेतली होती.

सुर्यवंशी एक महिन्यापुर्वी सेवानिवृत्त झालेला असूनही कामाचे मोजमाप पुस्तीकेचे (एमबी)चे काम पुर्ण करून पंचायत समीती कार्यालयातून बिल काढून देण्यासाठी सुर्यवंशी याने ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. संबंधित कंत्राटदाराने याबाबतचा तक्रारी अर्ज अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयास दिला होता. या तक्रारीनुसार दिनांक २७ व २८ जून तसेच काल (ता. ७) व आज (ता. ८) याची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सुर्यवंशीने तक्रारदाराने पुर्वी केलेल्या कामाचे एमबीचे काम पुर्ण करून दिल्याच्या मोबदल्यात तसेच सध्या पुर्ण केलेल्या कामाचे एमबीचे काम पुर्ण करून पंचायत समीती कार्यालयातून बिल काढून देण्यासाठी बिलाच्या रक्कमेच्या टक्केवारी प्रमाणे ४८ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज आज महादेव विष्णू सुर्यवंशी याच्याविरोधात त्याच्या राहत्या घरी सापळा लावला. यात ती रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सूर्यवंशी याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, राधिका माने, संजय संकपाळ, भास्कर भोरे, सलिम मकानदार यांनी सहभाग घेतला. लाच मागणीच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

Jalgaon Municipal Elections : भाजपची मास्टरस्ट्रोक 'खेळी'! मंगेश चव्हाण प्रभारी तर सुरेश भोळे निवडणूक प्रमुख; महाजनांकडे 'रिमोट कंट्रोल'

Latest Marathi News Live Update: गाडीत मराठी अनाउन्समेंट न झाल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक

Nrusinhawadi Tax : थकबाकीदारांना सवलत, प्रामाणिक करदात्यांना ठेंगा; शासन निर्णयावर नागरिकांमध्ये संताप

Agriculture News : डाळिंब-उसाकडे फिरवली पाठ! कसमादे पट्ट्यात पुन्हा 'कांदा एके कांदा'चा नारा

SCROLL FOR NEXT