islampur crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

प्रेमप्रकरणात अडसर ठरणाऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने निर्घृण खून...वाळवा तालुक्‍यात घडला प्रकार...खुनानंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर 

शांताराम पाटील

इस्लामपूर (जि. सांगली)- एकाच मुलीबरोबर दोन मित्रांच्या प्रेम प्रकरणातून जांभूळवाडी (ता. वाळवा) येथील अभिजीत हरी शेलार (वय 22) या महाविद्यालयीन युवकाचा त्याचा मित्र राजेंद्र मारुती बांदल (वय 25) याने धारदार शस्त्राने गळ्याचा कंठ तोडून सपासप 12 वार करत खून केला. बॉम्बे रेयॉन कंपनीच्या पाठीमागे पेठ-जांभूळवाडी रस्त्यावर आज दुपारी तीनच्या सुमारास हा खुन झाला. या घटनेने पेठ व जांभूळवाडी परिसरात एकच खळबळ माजली. संशयित राजेंद्र बांदल हा खून केल्यानंतर स्वतःहुन थेट इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या बाबतची फिर्याद मृत अभिजीतची आई सुवर्णा हरी शेलार यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत अभिजीत व राजेंद्र हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही अविवाहीत आहेत. संशयित राजेंद्र बांदल याचे गावातीलच एका मुलीबरोबर अलिकडेच प्रेमसंबंध जुळले होते. यापुर्वी त्याच मुलीबरोबर मृत अभिजीत याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे राजेंद्र बांदल हा अभिजीतला तु आमच्या प्रेमाच्या मध्ये येऊ नकोस, मला अडथळा आणू नकोस असे म्हणून अभिजीतला सांगत होता. मात्र अभिजीत आपल्या प्रेमात अडथळा असल्याने त्याला आज बॉम्बे रेयॉन कंपनीच्या मागे गाठून राजेंद्रने त्याचा खून केला.

अभिजीत हा मुळचा पेठेचा असून त्याचे मामा जांभूळवाडीत आहेत. त्यामुळे तो लहानपणापासून मामाकडेच असायचा. त्या दरम्यान राजेंद्र व त्याची बऱ्याच दिवसापासून मैत्री होती. मात्र या मैत्रीत प्रेमसंबंधाचा अडसर झाल्याने त्याचा काटा आज राजेंद्रने काढला. मृत अभिजीतचा गळा धारदार शस्त्राने तोडून त्याच्या डोक्‍यात, पोटात, अंगावर एकुण 12 सपासप वार करण्यात आले आहेत. खुनानंतर संशयित राजेंद्र हा इस्लामपूर पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. खुनाची माहिती कळताच पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT