पश्चिम महाराष्ट्र

पुसेसावळीत बीएसएनएल आऊट ऑफ रेंज

सकाळ वृत्तसेवा

पुसेसावळी : गेल्या महिनाभरापासून पुसेसावळी परिसरातील भारतीय दूरसंचार परिमंडळ (बीएसएनएल) लॅंडलाईन व इंटरनेटची सेवा खंडित आहे. त्याचा बॅंका, पतसंस्थांसह शाळा, महाविद्यालये आणि इतर ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. 
याठिकाणी कार्यरत असणाऱ्या कार्यालयाची वीज जोडणी तोडण्यात आल्याने कार्यालयातील बॅटऱ्या चार्जिंग होत नसल्याची समस्या उद्‌भवली आहे. त्यामुळे येथील सेवा खंडित झाल्याची माहिती पुढे आली आहे. 
पुसेसावळी परिसरातील भारतीय दूरसंचार परिमंडळचे कार्यालय पुसेसावळी गावात आहे; परंतु गेल्या महिनाभरापासून कार्यालयाचे वीज कनेक्‍शन थकबाकीचे कारण देत वीज वितरण कंपनीने बंद केले आहे. जवळपास सत्तर हजार रुपयांची थकबाकी येणे असल्याने हे कनेक्‍शन तोडल्याचे वीज वितरण कंपनीच्या येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत बीएसएनएलच्या पुसेसावळी आणि वडूज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही. 
वीज वितरण कंपनीचे पुसेसावळी येथील सहायक अभियंता व्ही. पी. पवार म्हणाले, की पुसेसावळी येथील भारतीय दूरसंचार परिमंडळाच्या पुसेसावळी कार्यालयाचे चालू वर्षीचे मार्च ते ऑगस्ट दरम्यानचे 70 हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने येथील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. याबाबत बीएसएनएलच्या वडूज कार्यालयाशी संपर्क साधला होता; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानेच आम्हाला पुसेसावळी कार्यालयाचा वीजपुरवठा बंद करावा लागला आहे. 
गेले महिनाभरापासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा खंडित झाल्याने याचा मोठा परिणाम बॅंका, पतसंस्था व शाळा ज्युनियर कॉलेजच्या व्यवहारावर झाला आहे. शाळा, महाविद्यालयांना ऑनलाइन माहिती भरणे किंवा विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी मोठी गैरसोय झाली आहे, तर ऑनलाईन बॅंकिंग सुविधा ग्राहकांना मिळू शकत नसल्याने परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. 

............................................................................................. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT