buffalo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच...भक्ती संगीत ऐकल्याशिवाय म्हैस देईना धार. 

सकाळवृत्तसेवा

कामेरी (सांगली)- भक्ती संगीत ऐकल्याशिवाय आजही अनेकांचा दिवस सुरू होत नाही. ग्रामीण भागात आजही सकाळच्या प्रहरी रेडिओवर भक्ती संगीत ऐकू येत असते. परंतू या भक्ती संगीताचा येथील म्हैसीला देखील लळा लागला आहे. फौजी बापू म्हणून परिचित असलेल्या कृष्णा जाधव यांची म्हैस संगीताची धून कानावर पडल्याशिवाय धारच देत नाही.

संगीत ही अशी किमया आहे की, त्यामुळे अनेकांचे जीवन आनंदी झाले आहे. संगीताने तर अनेकांनी दुःखावर मात केली आहे. संगीत ऐकून अनेकजण मंत्रमुग्ध होतात. त्यामुळे तर काही शहरात संगीत थेरपी देखील रूग्णांसाठी वापरली जाते. अशा या गोड संगीताचा लळा मुक्‍या प्राण्यांना लागला तर आश्‍चर्य वाटू नये. येथील कृष्णा जाधव यांच्या मुक्‍या जनावराला देखील संगीताची गोडी वाटू लागली आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर जाधव यांनी आपल्या शेतातच जनावरांचा गोठा बांधला आहे. या गोठ्यात चार म्हैसी आणि गाई पाळल्या असून त्यांची देखभाल उत्तम प्रकारे ठेवली आहे. गोठ्यातील स्वच्छता, जनावरांना योग्य वेळी चारा-पाणी अशी देखरेख चांगली प्रकारे राखली आहे. या जनावरांच्या गोठ्यात त्यांनी एफएम रेडिओ बसवला आहे. या एफएम वरून प्रसारित होणारी भक्ती गीते, लोकगीते आणि अन्य कार्यक्रमांचाही लळा या जनावरांना लागला आहे. रोज सकाळी जनावराचे दूध काढण्यापूर्वी भक्ती संगीत लावावे लागते, मग हे जनावरे भरघोस दूध देतात.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर खंड पडू नये म्हणून त्यांनी याठिकाणी बॅटरीची सुविधा गोठ्यात केली आहे. त्यामुळे जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर बॅटरीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरळीत होऊन एफएम पुन्हा सुरू राहतो. जाधव यांना फौजी बापू या नावानेच संबोधले जाते. बापूंना जनावराबरोबर मासे, कासव आणि मांजर यांचाही लळा आहे. रोज सकाळी विहिरीत असणाऱ्या माशांना व कासवांना हे घरातून खाऊ नेतात. सर्वजण बापूंची वाट पाहत असतात. देशाच्या सीमेवर संरक्षण करणारे फौजी बापू निवृत्तीनंतर प्राण्यावर जीवापाड प्रेम करत आहेत. त्यामुळे त्यांचे प्राणिमित्र फौजी बापू असे नामकरण केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT