sangli
sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

ऐकावं ते नवलच! गोठ्यात म्हशींसाठी उभारला चक्क स्विमिंग टॅंक

नागेश गायकवाड

पाच वर्षांपूर्वी चार मुरा म्हशीपासून सुरू केलेल्या मुक्त गोठ्यात आज बावीस मुरा म्हशी आहेत.

आटपाडी : एकाच जागेला बंदिस्त राहणे कोणालाच आवडत नाही. त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. तो ओळखूनच चिंचाळेचे उद्योजक शेतकरी माणिकराव गायकवाड यांनी डोंगरावर मुरा म्हशीचा अद्ययावत सोयी सुविधा युक्त मुक्त गोठा उभारला आहे. त्याला पाच वर्षे झाली असून मुक्त गोठा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यांच्यासाठी स्विमिंग टॅंक एक आकर्षणच होय.

चिंचाळेचे (ता. आटपाडी) गायकवाड यांचा गलाई व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त ते बाहेर असतात. गावाकडे शेतीवाडी आहे. त्यांना शेतीची आवड होती. त्यांनी गावात उंच टेकडीवर १५ एकर माळरान जमीन विकत घेऊन विकसित केली आहे. तेथे दोन एक एकरात मुरा म्हशीचा मुक्त गोठा उभारला आहे. इतर क्षेत्रात जनावरांसाठी विविध चारा, ऊस, साग याची लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी चार मुरा म्हशीपासून सुरू केलेल्या मुक्त गोठ्यात आज बावीस मुरा म्हशी आहेत.

कोणालाच एकाच जागी बंदिस्त राहू वाटत नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो. याला जनावरही अपवाद नाहीत. याचा विचार करून माणिकराव यांनी मुरा म्हशीसाठी मुक्त गोठा उभारला. दोन एकर क्षेत्राला चारही बाजूने बंदिस्त कंपाऊंड केले. आत ऊन, पाऊसपासून संरक्षणासाठी निवारा उभारला. तेथे जनावरांना बसल्यानंतर जखमा होऊ नयेत यासाठी बसण्यासाठी खाली माट, चारा आणि पाण्याचे स्वतंत्र हौद, धुण्यासाठी शावर, पंखे बसवलेत. बाहेरच शेतीचे खराब झालेल्या अवजारातून जुगाड अवजारांची निर्मिती केली आहे.

ज्वारी, बाजरी, मका आणि गहू स्वस्त झालेल्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करून जनावरासाठी लागणारे धान्य तयार केली जाते. त्यामुळे खर्चात बचत होते. कडबाकुटीच्या सहाय्याने चारा बारीक केला जातो. पाच गुंठ्यात पाण्याचा स्विमिंग टॅंक बांधला आहे. यात सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत म्हशी मनसोक्त पोहण्याचा आस्वाद घेतात. दर आठवड्याला त्यांचे पाणी बदलून शेतीला खत म्हणून वापरले जाते. प्रत्येक म्हशीला स्वतःचा कोड नंबर आहे. दर आठवड्याला ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेण गोळा केलले जाते. देखरेखीसाठी सी. सी. टी.व्ही. बसवला आहे.

"एका जागेला जनावरे बांधल्यामुळे एवढेच नाही तर स्विमिंग टॅंकमधील पाणी आठ दिवसांला बदलले नाही तर दुधावर परिणाम होतो हे आम्ही अनुभवले आहे. मुक्त जनावरांच्या गोठ्यामुळे दूध उत्पादनात चांगली वाढ होते. दूध आणि खतापासून मेंटेनन्स खर्च भागतो. मुरा म्हशीची रेडी सांभाळून मोठी करून लाखांच्या दरम्यान विकतो. तेच उत्पन्न राहते."

- माणिकराव गायकवाड (शेतकरी).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT