Surgery On The Ox After Wrongly Swallowing Gold 
पश्चिम महाराष्ट्र

बैलाने गिळले चार तोळ्याचे सोन्याचे गंठण; अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः पुरणपोळीच्या घासाबरोबर ओवाळणीच्या ताटातील चारतोळे सोन्याचे गंठण शेतकऱ्याच्या बैलाच्या पोटात गेले. दहा दिवस नैसर्गिकरित्या ते बाहेर पडेल यांची वाट पाहून थकलेल्या त्या कुटूंबाने अखेर पशुवैद्यकाच्या मदतीने शस्त्रक्रीया करुन, जठरातील गंठण बाहेर काढले.

संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथील प्रगतीशील शेतकरी बापूसाहेब प्रभाकर शिंदे यांच्या खिलारी बैलाने, शुक्रवार (ता. 30) रोजी बैल पोळ्याच्या दिवशी, पुरण पोळीचा नैवद्य खाताना ओवाळणीच्या ताटातून चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गिळले होते.

रविवार पर्यंत ते शेणातून बाहेर न आल्याने, राजहंस दूध संघाचे केंद्राधिकारी डॉ. नारायण नेहे यांनी पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राद्वारे तपासणी केली असता, ते पोटाच्या आतील चार कप्प्यांपैकी रेटीक्युलम या कप्प्यात आढळून आले. या दागिन्यासह लोखंडी तारेचे दोन तुकडेही त्या होते. सोमवार ( ता. 9) रोजी स्थानिक पातळीवर भुल देवून, शस्त्रक्रीया करुन गंठण काढण्यात आले. त्यांना डॉ. सोमनाथ चत्तर यांनी मदत केली.

जनावरांच्या चाऱ्यासह पोटात जाणाऱ्या धातूच्या वस्तू टोक किंवा धारदार असल्यास, अंतर्गत अवयवाला इजा होवून त्यात जनावराच्या जीवाला धोका पोचू शकतो. या बैलाच्या घासाबरोबर पोटात गेलेले गंठण पचनासाठी रवंथ करताना किंवा पचन झालेल्या अन्नाबरोबर बाहेर न आल्याने, ते रेटीक्युलम या कप्प्यात गुंतले होते. त्यामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागला. एक तासाच्या अवधीत ही शस्त्रक्रिया पूर्ण होवून बैलाची प्रकृती व्यवस्थित आहे. - डॉ. नारायण नेहे, पशुचिकीत्सक,  केंद्राधिकारी, राजहंस दूध संघ, संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT