The burglary caused panic in the factory premises 
पश्चिम महाराष्ट्र

भुरट्या चोरट्यांमुळे कारखाना परिसरात घबराट

घनशाम नवाथे

माधवनगर : मध्यरात्री दुकानाच्या दारावर कसली तरी खडबड ऐकू आली आणि शेजाऱ्यांना जाग आली. दोन तीन जण दुकान फोडत असल्याचे दिसल्यावर माणसं सावध झाली. मोबाईलवून निरोप गेले आणि मग अंधारात पाठलाग करुन लोकांनी चोरांना पकडलं. एक सापडला तर दोघं पळाली..हा असा थरात पंचशीलनगरमध्ये नेहमीचा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरात फरफोड्यांनी धुमाकूळ घातला आहे. भुरट्या चोरांमुळे साऱ्या परिसरात घबराट पसरली आहे. 

रविवारी रात्री पंचशीलनगर चौकातच असलेल्या बबन शिंदे यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. या अगोदर याच चौकातील अतुल खाडे यांचेही दुकान दोनदा फोडले होते. एका औषध दुकानावरही चोरट्यांनी डल्ला मारला होता. साखर कारखाना परिसरातील रस्त्यावरच असलेल्या बेकरीतही शटर उचकटून चोर शिरले होते. इतकेच नाही तर देशी दारुचे दुकानही चोरट्यांनी सोडले नाही. मध्यरात्रीनंतर या भागात चोरट्यांचा वावर जाणवतो. दोन तीन जणांच्या टोळ्या दुकानांची शटर उचकटून हातोहात चोऱ्या करत असल्याचे नागरीक सांगतात. 

साखर कारखाना परिसर, शिवाजी हौसिंग सोसायटी, गोसावी गल्ली, पंचशीलनगर ते जुना बुधगाव रोडपर्यंतचा भाग चोऱ्यांमुळे हैराण झाला आहे. नागरीकांनीच गस्त घालायची तर कुठंवर घालायची? कोणी घालायची असा सवाल असताना पोलीस यंत्रणा काय करते असाही सवाल नागरीक करत आहेत. या भागात सिसीटीव्ही बसवावेत, रोज रात्री पोलीसांनी गस्त घालावी अशी मागणी होत आहे. 

जुना बुधगाव रोडवर दहशत 
जुन्या बुधगाव रोडवर गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. रात्री हा रस्ता निर्मनुष्य असतो. बायपास रोडपासून ते पंचशीलनगर चौकापर्यंतचा रस्ता याबाबतीत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर पोलीस गस्त पथकाचे केंद्र सुरु करावे अशी मागणी होत आहे. 

पंचशीलनगर, साखर कारखाना परिसरामध्ये किराणा, मेडीकल, बेकरी आणि बरीच दुकाने आहेत. याशिवाय ही वस्ती उच्चभ्रू लोकांची आहे. या भागात गेल्या काही महिन्यांपासून सतत चोऱ्या होत आहेत आणि चोरटे हाताला लागत नाहीत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी याबाबत तात्काळ उपयायोजना करावी. 
- महेश शिंदे, सचिन माळी. (किराणा दुकानदार)


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT